खड्डेमुक्त महाराष्ट्र हे सरकारचे आश्वासन हवेत विरले - चित्रा वाघ
X
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची २६ सप्टेंबर रोजी बैठक आखण्यात आली होती. पदाधिकारी व कार्यकत्यांची हि बैठक होती. या बैठकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ एका पत्रकार परिषदेत बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी महिलांवरीत वाढते अत्याचार, वाढते इंधन दर यावरील त्यांचे मत व्यक्त करीत होत्या.
चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या की, राज्यात अत्याचारांचे प्रमाण वाढले असुन सर्वच क्षेत्रात राज्यातील सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. महिलांवरील वाढते अत्याचार पाहता छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी या स्त्ताधार्यांचा कडेलोट केला असता. असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. पुढे त्या म्हणाल्या की, सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी मुली उचलून आणण्याची भाषा करीत असेल तर यावरुन सध्याची परिस्थिती लक्षात घेण्यासारखी आहे. असे बोलून त्यांनी यावेळी राम कदमांवरही टिका केली.
इंधन दराबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, इंधनाच्या दराने तर पुरता बोजवारा उडवला आहे. कधी ते शंभरच्या पार जाईल सांगता येणार नाही. गेल्या चार वर्षांत सरकारने दिलेल्या आश्वासनांचा बुरखा फाडण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता करणार आहे. टोलमुक्त, खड्डेमुक्त महाराष्ट्र हे त्यांचे आश्वासन हवेत विरले. धनगर, मुस्लीम समाज व मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न कायम आहे, बेरोजगारी वाढून महागाईनेही कळस गाठला आहे.