Home > मॅक्स वूमन > मला शालेत जायचं न वं - क्रिशी

मला शालेत जायचं न वं - क्रिशी

मला शालेत जायचं न वं - क्रिशी
X

पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न सारा ।

जीवनाच्या दोरीवर चालते, घेऊन स्वप्नांचा सहारा ।।

दारिद्रयदोरीवर घेवून लोटा डोई, चाले पोरं डोंबाऱ्याची चिमुकली.

भटकंतीने शिक्षण नशिबी नाही, पोटासाठी आयुष्याची झाली पायमल्ली…

डोंबाऱ्यांची कथा आपण नेहमी ऐकतो... नजरेवर विश्वास न बसणारे ते त्यांचे खेळ आपण पाहतो... टाळ्या वाजवतो कधी पैसे देतो. मात्र याच्या पलिकडे कधी विचार केला का? की डोंबाऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळत असेल का? तर आज अशाच एका डोंबाऱ्याच्या मुलीची कहानी तुम्हाला मी सांगणार आहे. ज्या मुलीला शाळेत जायची इच्छा आहे. मात्र, पोट भरण्यासाठी तिला हा डोंबाऱ्याचा खेळ करावा लागतो.

“में क्रिशी... मेरा गाव छत्तीसगड के मिराजपूर में है. मुझे मेरे दादाजीने हे खेल सिकाया है. में पाच साल की थी तब मैंने ये खेल सिका. उसके बाद पाच साल से मैं ये सर्कस लोगोको दिखाकर पैसा कमा रही हूँ. मेरा ये सर्कस देखकर जमी हुई लोगो की गर्दी मुझपर टाली बजाती देखकर मुझे बहुत अच्छा लगता है. अब मैं हमारे गाव जाऊँगी ना तब स्कूल जाऊँगी.” असं क्रिशीने सांगितले.

लक्ष्मीनट गुजराती ही क्रिशीची आई... यांच्याशी मॅक्समहाराष्ट्रच्या टीमने बातचीत केली असता, त्यांनी सांगितले की आमच्या कुटुंबात आत्तापर्यंत कुणीच शाळेत गेलं नाही. मात्र, आता माझा मोठा मुलगा तिसरीत शिकतोय. गेल्या पाच वर्षांपासून क्रिशी हा खेळ दाखवून दिवसाला एक हजार रुपये कमावते. माझ १० जणांचं कुटुंब आहे. डोंबाऱ्याचा खेळ ही आमची रोजी रोटी आहे. याच्यावर आमचं कुटूंब चालतं तसेच नवरा दिवसाला चारशे रुपये कमावतो. क्रिशी शिकवून काय करणार आहे? आता तिला या सर्कसची सवय झाली आहे. असं तिच्या आईने सांगितले.

ही झाली क्रिशीची कहानी मात्र, अशा अनेक मुली आहेत. ज्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. आज सावित्री फुले यांची जंयती... ही जंयती सर्वत्र ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी होत असते. मात्र सावित्रीच्या सगळ्याच लेकींना शिक्षणाची साथ मिळाली असं नाही... सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षणाचा मार्ग दाखवला. मात्र, सावित्रींचा तो वसा प्रत्येक सावित्रीच्या लेकी पर्यंत पोहोचला का?

आजही आपल्या समाजात अनेक मुलींना शिक्षणापासून वंचित रहावे लागतेय. कधी सरकारकडून योग्य नियोजन केलं जात नाही. तर कधी आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे परिस्थिती समोर झुकावं लागतं. ही झाली दोन कारण, ज्यामुळे अनेक मुलींना किंवा मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागतेय. देशात बेटी पढाओ ही संकल्पना फक्त जाहिरातीमधून चमकतेय... कारण सद्यस्थितीतर दुर्देवी चित्र आपल्याला पाहायला मिळतेय.

का होतायत मुली शाळाबाह्य?

का होतायत मुली शाळाबाह्य यासंदर्भात आम्ही समता विभागाच्या नूतन यांच्याशी बातचीत केली असता, त्या म्हणाल्या… साधारण लहान भावंडासाठी, घरकामासाठी, बळजबरी देह विक्रीला लावल्यानंतर, भीक मागायला लावल्यानंतर, अधांतरी पालकांच छत्र हरपल्यानंतर, बालविवाह झाल्यानंतर, जनावरे चारण्यासाठी, वयात येताना मासिक पाळी सुरू झाल्यावर देखील काही मुली शाळाबाह्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, समता विभाग या शाळाबाह्य मुला-मुलींना पुन्हा शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी कार्यरत आहे. मात्र शिक्षणापासून वंचित राहणाऱ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी समाजाचा विरोध आणि शेणा, दगडाचा मारा सहन करत पुढाकार घेतला होता... त्यावेळी कुठलेही संवादाचे माध्यमं नसतानाही त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरु केली होती. सावित्रींनी दिलेला शिक्षणाचा वसा आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे आणि आपल्या या काळात संवाद आणि संपर्कासाठी अनेक माध्यमं उपलब्ध आहे. सोशल मीडिया सारख्या माध्यमावरुन आपण सर्वांनी सावित्रींचा विचार येणाऱ्या पिढीला दिला पाहिजे.

https://youtu.be/V9ZJRWGSfJE

Updated : 3 Jan 2019 5:26 PM IST
Next Story
Share it
Top