Home > मॅक्स वूमन > चाहत्यांच्या अपेक्षेने मला भीती वाटते - स्वप्ना बर्मन

चाहत्यांच्या अपेक्षेने मला भीती वाटते - स्वप्ना बर्मन

चाहत्यांच्या अपेक्षेने मला भीती वाटते - स्वप्ना बर्मन
X

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या हेप्टाथलॉन प्रकारात सुवर्ण पदक जिंकल्याने एका रात्रीत प्रसिद्ध झालेली स्वप्ना बर्मन.

एका वाहिनीवर तिने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ती म्हणाली, "आयुष्य बदलले पण मी मात्र आहे तेथेच आहे. लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. चाहत्यांचा आदर आणि अपेक्षा पाहून मी स्वप्न तर बघत नाही ना, असा विचार मनात डोकावतो. आधी माझे आईवडील आणि कोच माझ्याकडून जिंकण्याची तसेच चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगायचे. आता देशातील नागरिक माझ्याकडून आँलिम्पिक पदकाची अपेक्षा बाळगून आहेत. अपेक्षांच्या या ओझ्यामुळे मी नर्व्हस होते. मी चांगली कामगिरी करू शकले नाही तर काय होईल, " असा विचार आला की भीतीही वाटते. अशी तिने तिची प्रतिक्रिया व्यक्त केली.

Updated : 6 Oct 2018 2:11 PM IST
Next Story
Share it
Top