Home > मॅक्स वूमन > का घेतली संजय दत्तच्या पत्नीने महेंद्रसिंग धोनीची भेट ?

का घेतली संजय दत्तच्या पत्नीने महेंद्रसिंग धोनीची भेट ?

का घेतली संजय दत्तच्या पत्नीने महेंद्रसिंग धोनीची भेट ?
X

भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनीचे अनेक चाहते आहेत. त्याच्या खेळातील कामगिरीचे नेहमीच कौतूक होत असते. आपल्या कर्णधार पदाच्या काळात तर तो 'कॅप्टन कुल' म्हणून देखील प्रसिद्ध होता. महेंद्रसिंग धोनीने रोहित शर्माला पाकिस्तान विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात डीआरएमचा निर्णय घेण्याचं सांगितले होते व त्याच्या या निर्णयामुळे विरोधी खेळाडू बाद देखील झाला होता. ज्यामुळे धोनीचे सर्वत्र कौतुक झाले होते.

धोनीच्या चाहत्यांच्या रांगेत आणखी एक नाव आहे ते म्हणजे संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त. हल्लीच मान्यता यांनी महेंद्रसिंग धोनीची दुबईमध्ये जाऊन भेट घेतली. यासंदर्भात त्यांनी आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून माहिती देत धोनीसोबतचा सेल्फी पोस्ट केला आहे.

https://www.instagram.com/p/BoJAzLsDA_Y/?utm_source=ig_embed

Updated : 25 Sept 2018 7:24 PM IST
Next Story
Share it
Top