Home > Fact Check > Fact Check : JNUSU अध्यक्ष आयेशी च्या नक्की कोणत्या हाताला दुखापत झाली?

Fact Check : JNUSU अध्यक्ष आयेशी च्या नक्की कोणत्या हाताला दुखापत झाली?

Fact Check : JNUSU अध्यक्ष आयेशी च्या नक्की कोणत्या हाताला दुखापत झाली?
X

5 जानेवारी ला JNU कॅंपसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना जबर मारहाण करण्यात आली होती. विद्यार्थी संघटनेची नेता आयेशी घोष या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झाली होती. मात्र, या हल्ल्यानंतर आयेशी हिचे काही वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमधील काही फोटोमध्ये तिच्या डाव्या हाताला प्लास्टर दाखवलं आहे. तर काही फोटो मध्ये उजव्या हाताला प्लास्टर दाखवलं आहे.

त्यामुळे खरंच तिच्या कोणत्या हाताला दुखापत झाली होती? त्याचबरोबर सहानुभूती मिळवण्यासाठी तिने हे सर्व केलं का? असा सवाल देखील सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. संघाशी निगडीत असणाऱ्या शैफाली वैद्य यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. शैफाली यांनी आयेशी यांच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याचा फोटो ट्विट केला आहे. एका दिवसात तिच्या दुसऱ्या हाताला देखील दुखापत झाली. असं म्हणत त्यांनी तिच्या हाताला झालेल्या दुखापतीबाबत शंका उपस्थित केली आहे.

तर दुसरीकडे ABVP संघटनेचे राष्ट्रीय सचीव आशिष चौहान यांनी देखील या संदर्भात ट्विट केलं होतं. ‘आयेशी बॉलिवूड पेक्षा मोठी कलाकार आहे. डाव्या विचारसरणीच्या लोकांची ही दुसरी कॉमेडी आहे.’ असं म्हणत तिच्या हाताला झालेली दुखापत खोटी असल्याची सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

काय आहे सत्य?

आयेशी घोश यांच्या डाव्या हाताला प्लास्टर आहे. उजव्या हाताला नाही. उजव्या हाताला प्लास्टर केलेले फोटो हे फोटो शॉपमध्ये तयार केलेले फोटो आहेत. हे फोटो बनावट आहेत. कारण विविध माध्यमांनी घेतलेल्या फोटोमध्ये ही बाब स्पष्टपणे समोर येत आहे.

हिंदुस्थान टाईम्स ने या संदर्भात 7 जानेवारीला एक फोटो ट्विट केला असून तिच्या डाव्याला हाताला प्लास्टर असल्याचं दिसून येते.

हे ही वाचा

मॅक्स महाराष्ट्राच्या दणक्यानंतर स्टॅम्प व्हेंडर नरमले, सामान्यांना स्टॅम्प मिळण्यास सुरूवात

नवीन CDS (chief of Defense staff) समोरील आव्हानं

…तर डोक्यावर उभं असणार जग पायावर उभं राहील ! – संजीव चांदोरकर

आपण जर शैफाली वैद्य आणि ABVP च्या इतर नेत्यांनी ट्विट केलेले फोटो पाहिले तर आपल्याला ही बाब लक्षात येते. व्हायरल केलेल्या फोटोमध्ये आणि या फोटोमध्ये नक्की काय काय फरक आहेत.

  1. आयेशी च्या ज्या हाताला दुखापत झाली आहे. त्या हाता शेजारील माणूस पाहा...
  2. आयेशी च्या पाठीमागे उभा राहिलेला काळ्या रंगाचे जॅकेट घातलेला माणूस
  3. आयेशी च्या पाठीमागे उभी असलेली लाल रंगाचं स्वेटर घातलेली मुलगी

या सर्व व्यक्तीच्या मूळ फोटोमधील जागा पाहिल्यानंतर आपलं हे लक्षात येतं की, तिच्या कोणत्या हाताला दुखापत झाली आहे. आणि हे व्यक्ती इडीट केलेल्या फोटोमध्ये कुठं उभे आहेत.

Yeh Dekho News ने दाखवलेल्या व्हिडीओमध्ये देखील तिच्या डाव्या हाताला जखम झालेली दिसून येत आहे.

सौजन्य : Yeh Dekho News

त्यामुळं वरील सर्व फोटो पाहिल्यानंतर मॅक्समहाराष्ट्र च्या Fact Check मध्ये आयेशी यांच्या डाव्या हाताला दुखापत झाल्याचं दिसून आलं. तसंच शैफाली वैद्य आणि इतर नेटिझन्सनी केलेलं केलेलं ट्विट हे असत्य बाबींवर आधारीत असल्याचं दिसून आलं.

Updated : 11 Jan 2020 1:03 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top