Home > मॅक्स वूमन > ...त्या वक्तव्याबाबत स्मृती इराणींचे स्पष्टीकरण

...त्या वक्तव्याबाबत स्मृती इराणींचे स्पष्टीकरण

...त्या वक्तव्याबाबत स्मृती इराणींचे स्पष्टीकरण
X

काल २३ आँक्टोबर २०१८ रोजी केलेल्या स्मृती इराणी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांनी नवीन वाद ओढवून घेतला आहे. स्मृती इराणी यांनी “रक्ताने माखलेले पॅड घेऊन मित्रांच्या घरी जात नाही मग देवाच्या मंदिरात जाल का? मंदिरात जाणं आणि प्रार्थना करणं हा सर्वांचाच अधिकार असला तरी मासिक पाळीच्या दरम्यान तुम्ही मंदिरात कशा काय जाऊ शकाल?” असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे त्या वादाच्या भोवर्‍यात अडकल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या या वक्तव्यामुळे रोष व्यक्त केला.

ज्यामुळे त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन या वादग्रस्त वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन म्हटले आहे की, 'माझ्या वक्तव्यावर बरेचजण प्रतिक्रिया देत असल्यामुळे आता मी स्वत:च माझ्या वक्व्यावर प्रतिक्रिया देत आहे', 'एक हिंदू म्हणून झोराष्ट्रीयन व्यक्तीशी लग्न केल्यामुळे मला प्रार्थना करण्यासाठी अग्यारीमध्ये जाण्याची परवानगी नाही','फारसी समुदायाचा आणि त्यांच्या धर्मप्रचारकांचा मी आदर करते. केवळ दोन झोराष्ट्रीयन मुलांची आई आहे म्हणून प्रार्थनेच्या हक्कासाठी मी न्यायालयाकडे धाव घेतलेली नाही', 'मुळात मासिक पाळीच्या वेळी पारसी किंवा पारसी समुदायातील नसलेल्या कोणत्याच महिला अग्यारीत जात नाहीत', मग त्यांचं वय कितीही असो, ही दोन्ही वास्तवदर्शी विधानं असून आता ज्या इतर चर्चा रंगत आहेत, त्यातून गैरसमजच परसलवला जात आहे. आपल्या वक्तव्यानंतर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहून ही बाब आपल्याला थक्क न करता उलटपक्षी आपल्या मनात कुतूहल निर्माण करत आहे की महिला म्हणून मी स्वत:चं मत मांडण्यास मी स्वतंत्र नाही 'पण, ज्यावेळी माझ्याकडून उदारमतवादी दृष्टीकोन मांडला जातो तेव्हा तो स्वीकारार्ह असतो. हा कसला उदारमतवाद?'असा प्रश्न त्यांनी आपल्या ट्वीटमार्फत टिकाकरांना केला आहे.

https://twitter.com/smritiirani/status/1054722071236931585

https://twitter.com/smritiirani/status/1054722071236931585

https://twitter.com/smritiirani/status/1054722444962000896

https://twitter.com/smritiirani/status/1054722693260554242

Updated : 24 Oct 2018 3:43 PM IST
Next Story
Share it
Top