महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची फेरनियुक्ती
Max Maharashtra | 21 Feb 2019 6:29 PM IST
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची फेरनियुक्ती राज्य सरकारने केली आहे. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल.
‘माझी फेरनियुक्ती केल्याबद्दल मी राज्य सरकारचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचे आभार मानते. गेल्या तीन वर्षांत आयोगाने महिलांच्या अनेक प्रश्नांना हात घातलेला आहे. खूप काही करण्याचा प्रयत्न केला आहे. तीच रेघ पुढे ओढून पुढील तीन वर्षांमध्येही आयोगाचे काम सर्वस्पर्शी, सर्वांगीण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन,’ अशी प्रतिक्रिया श्रीमती रहाटकर यांनी दिली.
औरंगाबादच्या माजी महापौर असलेल्या विजया रहाटकर या भाजप महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्षादेखील आहेत. राष्ट्रीय पातळीवरील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध आहे.
Updated : 21 Feb 2019 6:29 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire