Home > मॅक्स वूमन > शिक्षणाने विवेकी आणि निर्भय बनलेल्या लेकी हे सवित्रीबाईंचं बर्थडे प्रेझेंट- मुक्ता दाभोळकर
शिक्षणाने विवेकी आणि निर्भय बनलेल्या लेकी हे सवित्रीबाईंचं बर्थडे प्रेझेंट- मुक्ता दाभोळकर
Max Maharashtra | 3 Jan 2019 3:55 PM IST
X
X
मी मुक्ता दाभोलकर, मी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील एक कार्यकर्ता आहे.
मी कायद्याची पदवीधर असून शिक्षणशास्त्रात पदव्युत्तर पदवी असे औपचारिक शिक्षण घेतलेले आहे.
मला वाटतं, आपण सगळ्याजणी, ज्या आईवडीलांच्या पोटी जन्मलो त्यासोबतच सावित्रीबाई आणि जोतीरावांच्याही लेकी आहोत! आपल्याला स्वतंत्र व्यक्ती म्हणून सन्मानानं जगता यावं यासाठी त्यांनी सोसले कष्ट कसे विसरता येतील? सावित्रीबाईंना अभिप्रेत असलेले शिक्षण म्हणजे फक्त साक्षरता आणि पदवी नव्हे! शिकताना व्यक्तीला प्रश्न पडले पाहिजेत आणि त्यांची उत्तरे शोधायचा मार्गही सापडला पाहिजे. शिक्षणाने विवेकी आणि निर्भय बनलेल्या लेकी हे सवित्रीबाईंचं आजच्या भाषेतलं बर्थडे प्रेझेंट! सवित्रीला स्वतःत रुजवण्याची माझी प्रेरणा अधिक बळकट व्हावी म्हणून मी आज त्यांचा जन्मदिवस उत्सवासारखा साजरा करणार आहे.
मुक्ता दाभोलकर
Updated : 3 Jan 2019 3:55 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire