ड्रामा क्वीन राखीचा विचित्र सल्ला...
X
बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतेच. ती नेहमीच आपली पब्लिसिटी वाढवण्याच्या प्रयत्नात वादग्रस्त वक्तव्य करत असते. #MeToo मोहिमेवेळी चर्चेत असलेले नाना व तनुश्री यांच्या वादातदेखील ती खास चर्चेत आलेली. आता तिने एक नवा वाद ओढवून घेतला आहे.
राखीने एक असा व्हिडीओ शेअर केला आहे की ज्यामध्ये ती मुलींना बलात्कारापासून वाचण्याचे मार्गदर्शन करत आहे. ती या व्हिडिओत स्वत:ला शास्त्रज्ञ म्हणवून घेत आहे. तिने तिच्या कंबरेला साखळी बांधून त्याला टाळे लावले आहे, आणि अशाचप्रकारचे टाळे लावण्याचा सल्ला तिने मुलींना दिला आहे. तिने हा व्हिडीओ पब्लिसीटीसाठी जरी टाकला असला तरी यामुळे ती नव्या वादातून चर्चेत आली हे नक्कीच. आणि हा तिचा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता इतकचं म्हणता येईल हिला कोणीतरी आवरा रे...
https://www.instagram.com/p/BpT3bSCF6aG/?utm_source=ig_embed