Home > मॅक्स वूमन > डोनाल्ड ट्र्ंपवरील आरोपाचे पत्नीने मागितले पुरावे...

डोनाल्ड ट्र्ंपवरील आरोपाचे पत्नीने मागितले पुरावे...

डोनाल्ड ट्र्ंपवरील आरोपाचे पत्नीने मागितले पुरावे...
X

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्स आणि प्लेबॉय मासिकाची मॉडेल करेन मॅकडोगल यांनी शरीरसंबंध असल्याचा आरोप केला होता. डोनाल्ड यांच्या पत्नीने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याबाबत सांगितले की, या सर्व आरोपामुळे आमच्या वैवाहिक जीवनात कसल्याही प्रकारचा तणाव नाही. त्यांचे कथित विवाहबाह्य संबंध हा माझ्यासाठी काळजीचा विषय नसून आयुष्यात करण्यासारख्या इतर बऱ्याच गोष्टी आहेत, मी आई आहे. अमेरिकेची फर्स्ट लेडी आहे. विचार करण्यासाठी आणि काम करण्यासाठी इतर महत्त्वाचे विषय आहेत. काय खरं आहे आणि काय खोटं आहे, हे मला माहीत आहे. ज्या महिलांनी हे आरोप केले आहेत, त्यांना सबळ पुरावे द्यावे लागतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Updated : 13 Oct 2018 5:50 PM IST
Next Story
Share it
Top