जे पुजारी देवीचे कपडे बदलतात त्यात तुम्हाला विकृती दिसत नाही का? - तृप्ती देसाई
X
कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिरात महिलांसाठी नियम करण्यात आला आहे. महिलांना तोकड्या कपड्यांत मंदिरात प्रवेश करण्यास देवस्थान समितीने मनाई केली आहे. यासंदर्भात आता भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी एका व्हिडीओद्वारे आपली प्रतिक्रिया देऊन सवाल देखील उपस्थित केला आहे.
या व्हिडीओमध्ये त्या म्हणाल्या की, “समितीने एका महिला सदस्यांना पुढे केले आहे, या महिला सदस्याने तृप्ती देसाईंना बघून घेऊन आम्ही कोल्हापूरकर आहोत अशी धमकी दिली आह, तर मी सुद्धा कोल्हापूरकर असून महाराणी ताराराणीची शिकवण घेतलेली आहे. ड्रेसकोडबाबत समितीने जे नियम लागू केले आहेत, तेच नियम गाभार्यातल्या अर्धनग्न पुजार्यांना लागू आहेत का? जे पुजारी देवीचे कपडे बदलतात त्यात तुम्हाला विकृती दिसत नाही का? उद्या जर नागासाधू दर्शनाला आले तर त्यांना कपडे घालायला लावूनच दर्शन घ्यायला सांगणार का? याचे उत्तर समितीने लवकरात लवकर द्यावा,”असे बोलून त्यांनी हाच नियम गाभार्यातल्या पुजार्यांनाही लावणार का असा प्रश्न यावेळी उपस्थित केला आहे.