मेकअप आणि कपड्यांवर वेळ वाया घालवू नका - अमृता फडणवीस
Max Maharashtra | 23 Oct 2018 5:42 PM IST
X
X
'आजच्या मुलींनी प्रिन्सेस डायनाकडून प्रेरणा घ्यावी,' असा अमृता फडणवीस यांनी सल्ला दिला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या 'अलोम मिस मुंबई 2018' च्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, "सर्वांना एक छोटासा संदेश. मेकअप, कपडे आणि इतर गोष्टींवर तुमचा वेळ वाया घालवू नका. अंतर्बाह्य सुंदरता गरजेची आहे. त्यासोबतच आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन गरजेचा आहे. त्याने व्यक्ती उठून दिसतो, मला वाटतं आजच्या मुलींनी प्रिन्सेस डायनाकडून प्रेरणा घ्यावी. त्या नैसर्गिक सुंदरता आणि आत्मविश्वासाचं जिवंत उदाहरण होत्या," असे त्या म्हणाल्या.
Updated : 23 Oct 2018 5:42 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire