Home > मॅक्स वूमन > माझ्या बापाच्या मृत्यूचं राजकारण करु नका, पंकजा मुंडे आक्रमक

माझ्या बापाच्या मृत्यूचं राजकारण करु नका, पंकजा मुंडे आक्रमक

माझ्या बापाच्या मृत्यूचं राजकारण करु नका, पंकजा मुंडे आक्रमक
X

गेल्या काही दिवसांपूर्वी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूप्रकरणी वेग-वेगळे तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र सर्वांच लक्ष लागून राहिलं होत ते पकंजा मुंडे यांच्या वक्तव्याकडे की त्या काय बोलणार... आता या चर्चेला पूर्णविराम नाही पण वेगळं वळण पंकजा मुंडे यांनी दिल्याचं चित्र पाहायला मिळतेय.

माझ्या बापाला काही झालं असेल तर मी त्याचा जीव घेईन मला कोणत्याही तपास यंत्रणेची गरज नाही असं वक्तव्य महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. माझ्या बापाला काही झालं असेल तर त्या माणसाचा जीव घेईऩ आणि त्यानंतर माझा जीव जागच्या जागी जाईल असं पंकजा मुंडे म्हटल्या आहेत.

बीडमध्ये एका सभेत बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही सडकून टीका केली. लुच्च्या लबाडांना आता मुंडे साहेबांच्या मृत्यूमध्येही राजकारण दिसतं आहे. जयंत पाटील म्हणतात की पंकजा मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे कारण मुंडे साहेबांची हत्या झाली. हत्या झाली की नाही हा विषय आता तुमचा नाही. तुम्ही जर चौकशीची मागणी करत असाल तर सुरूवात तुमच्यापासूनच केली पाहिजे असंही त्या म्हटल्या. बीडमध्ये आयोजित मतदार संघातील विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पाहा नेमकं काय म्हटल्या पंकजा मुंडे...

Updated : 5 Feb 2019 7:45 AM IST
Next Story
Share it
Top