आज मेणबत्या पेटल्या नाही....??
X
देवळा बाहेर दबा धरून बसलेल्या माणसातल्या हैवानांनी शरीराची भूक भागविण्यासाठी एकीचा बळी घेतला,अन् एकिच बालपण गिळलं, त्यावेळी देवळातला देव दगड झाला होता, आपल्या न्याय व्यवस्थे सारखा, समाजा सारखा....!!)
प्रश्न -बाळा त्या दिवशी कुठ् गेला होता?
पीड़ित - ते हे ना आम्हाला तिकडी नेलत वढित...
आम्हाला वर केला,... अन्मलाकपडेकाढायलालावले
अन् आम्हाला म्हंला खाली झोपा. अन् आम्हाला चॉकलेट दिल
प्रश्न- खूप घाबराला होता का?
ऊत्तर- हा...
( डोळ्यात साठवलेली कळ ओघळली)
ते ढकलित व्हता तीला ,
ते म्हणती मला का ढकलीतो .....
तीला लय तरास दिला..................
प्रश्न- घरी का सांगीतल नाही?
उत्तर-(...............)
प्रश्न -काय मागणी कराल?
उत्तर-गरीबाला कोण हाय, असा अन्याय थांबला पाहिजे, पंतप्रधान मोदीन 15 ऑगस्टला सांगीतल व्हत, अस करणाऱ्याला शिक्षा देणार, आता दया फाशी…!!
काळजाला भोकं पडणारी आणि व्यवस्थे विरुद्धचा संताप व्यक्त करणारी, ही वाक्य आहेत, पिंपरी चिंचवड परिसरात घडलेल्या बलात्कार पिडित चिमुकलीची आणि तिच्या हतबल बापाची.
घरात, अठरा विश्व दारिद्र्य असल्यानं न्यायासाठी अशी याचना करण्या पलीकडे कोणताही लढा देण्याचबळ,त् या बापात राहील नव्हत. एव्हड़च त्याच्या बोलण्यातुन जाणवलं.
आणि पोरींन बोललेला एक-एक शब्द विश्वासलाच नागडा करत होता.
काय बोलणार?, कुणाला बोलणार,....?
पोलिसांनी आरोपींना अटक केली त्यांच काम संपल, आता कसोटी न्यायव्यवस्थेची, कसोटी कसली म्हणा अश्या शेकड्यांन केसेस पडून आहेतच की,
चैनल ने बातम्या दाखवल्या, (त्यातही मोजक्याच चैनलनी). पेपर ने रकाने भरले, त्यांचंही काम संपलं, राहील कोण तर राजकारणी, आणि समाज सेवी.
दोघांपर्यंत ही घटना पोहचलिच नव्हती, कारण घरात बसून फेसबुक आणि ट्विटर वर कुण्या समाजसेव्यानि गळा काढला नाही, आणि शहरात कामगार मंत्री निलंगेकर हजर असुनही त्यांनी, ना ह्या प्रकाराची माहीती घेतली, ना पीड़ित कुटुंबाच सांत्वंन वगैरे करण्यासाठी त्यांच्या घरी जाण्याची तसदी घेतली, ते सोडा, आपल्या भाषणात साधा उल्लेखही न करता, बाबा फक्त बड़ेजाव मीरऊन निघुन गेला. ज्यांच्या मुलींवर अत्याचार झालेते कुटुंब फडात राबणाऱ्या कामगारांच होतं, आणि त्याच खात्याचे आपण मंत्री आहोत. याचीही जाणीव नसेल का निलंगेकरांना....??
ह्या विचारात रात्र झाली, तिच्या झोपडित अंधार पसरलाय, बाजूला माय आणि बाप जागीच आहेत, दिवस भरात घरा समोर जमलेलेल्या गर्दीतील बहुतेक नजरा, पोरगी बलात्कार करण्या एव्हड़ी मोठी होती का? हेच बघन्यासाठी जमली होती त्यातून परत-परत होणारा बलात्कार, आता त्या चिमुकलीलाही कळत होता अन् तिच्या माय बापालाही, अश्यात कशी येईल त्यांना झोप....??
कोवळ्या वयात झालेला आघात सहन न झाल्याने ह्या घटनेतील दूसरी मुलगी उपचारा दरम्यांन मेली.
जी वाचलीय, तीही आता रोज मरतेय, कारण तीला कळलय, आपलही चार भिंतीच् पक्क् घर असतं, मुकादमाच्या जागी, आपल्या तांड्यावर, कधितर एखादा शिक्षक, डॉक्टर किंवा पोलिस फिरकला असता, तर त्यांचे विचार एकायला मिळाले असते, सुरक्षा राहली असती, स्व-संक्षणाची जाणीव झाली असती, आणि अस् झाल असतं ,तर त्या देवाकड़ भिक मागायला जायची वेळही आली नसती .
हो, त्या दोघीही दर्शनालाच गेल्या होत्या.
ज्या गरीबिच्या शापाने आपल कोवळ बालपन खुडलं, त्या शापातुन मुक्त होण्यासाठी, दर्शन घेत त्या म्हणत असतील, आम्हालाही बागड़ू दे... खेळू दे .
देव तर पावलाच नाही. साक्षात्कार मात्र हैवानांचा झाला,समाजांन आणि व्यवस्थेन पैदा केलेल्या हैवानांचा...!!!!
-गोविंद वाकडे.