चर्चा तिच्या हिजाबची!
Max Maharashtra | 11 Sept 2018 4:40 PM IST
X
X
सारा इफ्तेखार, ही वीस वर्षाची तरूणी संपूर्ण जगात चर्चेचा विषय बनलीय. सारा इंग्लंडमधल्या सोंदर्य स्पर्धेत भाग घेणार आहे. मिस इंग्लंड स्पर्धेत या आधीही अनेकांनी भाग घेतलाय, त्यामुळे नेमकं साराचीच चर्चा का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हो, सारा या स्पर्धेत हिजाब घालून म्हणजे, बुरखा घालून भाग घेणार आहे. हिजाब घालून सौंदर्य स्पर्धेत भाग घेणारी ती बहुधा पहिली मुस्लीम महिला ठरणार आहे. या आधी काही मुस्लीम महिलांनी डोक्यावर स्कार्फ बांधून स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे.
सध्या युरोपातल्या अनेक देशांमध्ये मुस्लीम धर्मीयांच्या विरोधात वातावरण आहे, त्यातच युरोपातल्या काही देशांमध्ये हिजाबला बंदीही घालण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर सारा च्या हिजाब घालून सौंदर्य स्पर्धेत उतरण्याच्या निर्णयाची चर्चा होतेय.
Updated : 11 Sept 2018 4:40 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire