Home > मॅक्स वूमन > डॅाक्टर मूलीची आई-वडीलांकडूनच हत्या...

डॅाक्टर मूलीची आई-वडीलांकडूनच हत्या...

डॅाक्टर मूलीची आई-वडीलांकडूनच हत्या...
X

सध्या सुरु असलेल्या घटनांमुळे प्रेम करणे खरचं गुन्हा आहे का हा प्रश्न उद्भवतोय. काल मालेगावमध्ये झालेल्या घटनेनंतर आज सालगड येथे देखील जन्मदात्या आई-वडिलांनीच आपल्या २२ वर्षीय मुलीची हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. तसेच सुगावा लागण्यापूर्वी अंत्यसंस्कार करुन ह्या घटनेचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न या मुलीच्या आई-वडिलांनी केला.

मृत मूलीचे नाव अनुराधा विठ्ठल बिराजदार असून तिने सालगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याने तिच्या आई-वडिलांनी तिची हत्या केली. कर्नाटकातील सिंदगी येथे अनुराधा ही बी.ए.एम.एस.चे शिक्षण घेत होती. तिने प्रेमविवाह केल्याचे वृत्त तिच्या वडिलांना समजले तेव्हा त्यांनी प्रेमविवाहाच्या बदनामीने संतापल्याने तिला बहाण्याने घरी आणून तिची ५ तारखेला तिची हत्या केली व शेतातच तिच्यावर अंत्यसंस्कार करुन पुरावे देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलीसात तक्रार दाखल केल्यानंतर या घटनेचा सुगावा लागला.

मूलीच्या आई-वडिलांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated : 6 Oct 2018 12:31 PM IST
Next Story
Share it
Top