Home > मॅक्स वूमन > महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे-लोणावळा रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे...

महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे-लोणावळा रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे...

महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे-लोणावळा रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे...
X

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच गंभीर राहिला आहे. सतत महिलांवर होणाऱ्या अत्याचार,छेडछाड किंवा चोरीचे प्रकार अशा गुन्ह्यांना चाप बसवण्यासाठी पुणे-लोणावळा स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे.

हे सीसीटीव्ही कॅमेरे निर्भया फंडाच्या अंतर्गत बसवण्यात येणार आहेत. असे रेल्वे विभागीय व्यवस्थापक मिलींद देऊस्कर यांनी सांगितले आहे.

प्रवासादरम्यान महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करुन हे कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे-लोणावळा या मार्गावरील नियमित प्रवास करणारे बरेच आहेत. त्यामुळे या मार्गावर रात्रीपर्यंत सेवा दिली जाते. त्यावेळी चोरीच्या घटना तसेच महिला सुरक्षिततेच्या समस्या उद्भवतात. या सर्व गोष्टींचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेमार्फत प्रत्येक विभागात सुरक्षा व्यवस्थेचे नूतनीकरण, अद्ययावतीकरण यासाठी स्वतंत्र निर्भया फंड हि योजना जाहीर केली आहे. या निधीचा वापर आता हे सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यासाठी केला जाणार आहे. हे काम मार्च 2019 पर्यंत केले जाईल अशी माहिती रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी दिली आहे

Updated : 28 Dec 2018 6:07 PM IST
Next Story
Share it
Top