भाजपला सत्तेची मस्ती आलेली आहे - सुप्रिया सुळे
X
गेल्या दोन दिवसांपासून खासदार सुप्रिया सुळे या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी या दौऱ्याच्या वेळी तालुक्यात स्वत: भेट दिली. तेथील शेतीची पाहणी करुन, शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, गुलाबराव देवकर, वाल्मिक पाटील व पदाधिकारी हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.
त्या म्हणाल्या की, “जिल्ह्यात भारनियमन सुरू आहे. सणासुदीच्या दिवशी भारनियमन हे चुकीचे आहे.” पुढे त्यांनी सरकारला देखील धारेवर धरले. त्या म्हणाल्या की, “राज्यातील सरकार करते काय, भाजपाला सत्तेची मस्ती आलेली आहे. ही मस्ती आता जनता लवकरच उतरविणार आहे. जनता दुष्काळाने होरपळून निघाली आहे, याची चिंता मुख्यमंत्र्यांना नाही. सामाजिक भान ठेवून सरकारने काम केले पाहीजे. मी जळगाव जिल्हाचा दौरा करीत असतांना सर्वच रस्ते खड्डेमय झालेले निदर्शनास आले. शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा तसेच उडीद, भुईमूग, मुग या पिकांना हमीभाव जाहीर करावा.” अशी मागणी त्यांनी केली.
सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांना, राज्य दुष्काळाने होरपळून निघाले आहे. हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना आधार मिळावा म्हणून राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्री ’मुहूर्त’ बघत आहेत का, असा सवाल देखील यावेळी केला.