Home > मॅक्स वूमन > ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’….पण कसं ?

‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’….पण कसं ?

‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’….पण कसं ?
X

देशात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांवरुन राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी केंद्र तसंच राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने मुलींच्या शिक्षण, सुरक्षिततेबाबत बोलत असतात. मग त्यांच्याच सरकारमध्ये अशा घटना का घडत आहेत? या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन बाळगून का आहेत? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. शुक्रवारी हरयाणात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला, या घटनेचा सुप्रिया यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला असून आपण सर्वांनी या घटनेचा निषेध व्यक्त करायला हवा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे.

पंतप्रधान मोदी नेहमी महिलांच्या सुरक्षेबाबत बोलतात, मात्र त्यांच्या कृतीतून काही दिसत नाही अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातही बेपत्ता मुलींची संख्या वाढत आहे. याबाबत चिंता व्यक्त करत सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील जवळपास तीन हजार महिला बेपत्ता आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढतेच आहे. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे आमदार मुलींच्या अपहरणाची भाषा वापरत असून मुख्यमंत्री त्याबाबत एक शब्दही काढत नाहीत. मुख्यमंत्री हे राज्याचे गृहमंत्री देखील आहेत तरी असे बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही, ही गंभीर बाब असल्याचे सुप्रिया यांनी यावेळी सांगितलं.

बेटी पढाओ, बेटी बचाओ’….पण कसं ?

हरियाणाच्या रेवाडी येथे ही बलात्काराची घटना घडली आहे. विशेष म्हणजे सीबीएसई बोर्डात टॉप केल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्या तरुणीचा सन्मान करण्यात आला होता. पीडित तरुणीच्या आईने आरोप केला आहे की, मुलीचं अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पंतप्रधान म्हणतात, ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’….पण कसं ? असा संतप्त सवाल तरुणीच्या आईने विचारला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर काय उत्तर देतात पाहणं महत्वाचे आहे.

Updated : 15 Sept 2018 12:30 PM IST
Next Story
Share it
Top