Home > मॅक्स वूमन > महिला पत्रकारांचा देखील लैंगिक शोषण केल्याचा आरोप

महिला पत्रकारांचा देखील लैंगिक शोषण केल्याचा आरोप

महिला पत्रकारांचा देखील लैंगिक शोषण केल्याचा आरोप
X

तनुश्री दत्ताच्या नाना पाटेकरांवरील आरोपांमुळे सध्या भारतात चांगलीच खळबळ सुरु आहे. यासाठी सोशल मिडीयाने देखील पाठिंबा दर्शवून एक मोहिम सुरु केली आहे. 'मी टू' असे या मोहिमेचे नाव आहे. या मोहिमेच्या सुरु करण्याने अत्याचार झालेल्या कित्येक वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला आता समोर येत आहेत. आपल्यावरील अत्याचाराबाबत त्या आता आवाज उठवत आहेत. भाजपच्या उदित राज अकबर या खासदारावर देखील अत्याचाराचा आरोप केला आहे. इतकेच नव्हे तर एका इंग्रजी वृत्तपत्राचे संपादक एम जे अकबर ह्यांच्यावर देखील तब्बल सहा महिला पत्रकारांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. एका महिला पत्रकाराने अकबर यांच्याबाबतीतील भेटीचा घाणेरडा अनुभव सोशल मीडियावर सांगितला. त्यावेळी त्यांनी अशी माहिती दिली की, अकबर हे हॅाटेलच्या रुममध्ये मुलाखती घेऊन दारु पिण्यासाठी ऑफर करीत असत. तसेच अश्लिल कमेंट करणे, मॅसेज पाठवणे हा आरोप तिने यावेळी सांगितला.

Updated : 11 Oct 2018 5:35 PM IST
Next Story
Share it
Top