मनाने बाई आणि डोळ्याने आई झालेल्या सूर्यफुलांना महिला दिनाच्या ५ लाखांचा अपघाती विमा देऊन अनोख्या शुभेच्छा
राग - द्वेषाच्या माळरानावर उगवत जावे माणूसपणाचे फुल गळूनी पडावे बाभळीचे गर्भ आणि पदरात उरावी ओल असं सांगत समाजाच्या लेखी दुर्लक्षित असलेल्या भले शरीराने नाही पण मनाने बाई आणि डोळ्याने आई झालेल्या सूर्यफुलरुपी १० ट्रान्सजेंडरला अनोख्या पध्दतीनं 'जागतिक महिला दिनाच्य शुभेच्छा देत ट्रान्स थॉट संस्थेने प्रत्येकी ५ लाखांचा अपघाती विमा भेट दिला आहे.
X
महाराष्ट्र राज्यात सर्व स्तरातील लोकांसाठी समाजिक, राजकीय तसेच वैयक्तिक पातळीवर काम करणाच्या १० ट्रान्सजेंडरला निवडण्यात आलं असून प्रत्येकी ५ लाखांचा अपघाती विमा काढण्यात आला आहे. या १० ट्रान्सर्जेंडरची निवड प्रातिनिधिक स्वरुपात करण्यात आली असन ८ मार्च 'महिला दिना' दिवशी हा विमा त्यांच्या सेवेस सादर करण्यात येईल असे संस्थेचे राहुल सिद्धार्थ साळवे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले.
ट्रान्सजेंडर समूह नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. त्याही या समाजाचा एक अविभाज्य भाग आहेत, याची जाणीव फार कमी लोकांमध्ये दिसते. त्या स्वतंत्र महिला असून त्यांनाही सर्वसामान्य व्यक्तिप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. या जाणीवेतून सामाजिक काम करतेवेळी चुकून अपघात झाल्यास त्यांचे कार्य विना अडथळा थांबता कामा नये, यासाठी हा उपक्रम Trans Thought टीमच्या वतीने राबवण्यात येत आहे, असे संस्थेचे दिपक सोनावणे सांगितले.
हा अनोखा उपक्रम देशात प्रथमच राबवण्यात येत असून ट्रान्सजेंडर समूह आणि इतर सर्व स्तरातून या उपक्रमाचं स्वागत करण्यात येत आहे.आपल्या माध्यमातून हा उपक्रम लोकापर्यंत पोहचावा जेणेकरून आणखी काही तरुण पुढे येऊन या उपक्रमाची- विचारांची गती वाढवण्यासाठी हातभार लावतील, अशी अपेक्षा ट्रान्स थॉटचे राजेश मोरे यांनी व्यक्त केली आहे.
जगभरात जागतिक महीला दिन साजरा होत असताना ट्रान्सजेंडर समूह नेहमीच शासनाच्या आणि समाजाच्या लेखी दुर्लक्षित असताना. या निमित्ताने ते चालत राहतील. पायाच्या भिंगरीला आम्ही आमच्या परीने - आमचा पात्रतेनुसार एक कागदी फुल बांधत आहोत. आशा करतो त्या फुलाने तुमचा पुढील प्रवास थोडाफार का होईना सुगंधी होईल, असे राहूल साळवे म्हणाले.
महाराष्ट्रातील खालील १० ट्रान्सरजेंडरचे प्रातिनिधिक स्वरूपात 'Trans Thought' संस्थेने अपघात विमा काढले आहेत.
1. सलमा खान
2.दिशा पिंकी शेख
3. चांदणी शेख
4. प्रिया पाटील
5. शमिभा पाटील
6. विकी शिंदे
7. गौरी शिंदे
8. अनिता वाडेकर
9. पाकिजा जान किन्नर
10.चंदना खान
#10Transgenders
#10Accidental_insurance #womens_day_2021