धर्माला मासिक पाळीची ‘अडचण’ का ?
हिंदू धर्मात मासिक पाळी दरम्यान महिलांसाठी अनेक नियम बनवले आहेत. या नियमांनुसार, स्त्रीला मासिक पाळीत पूजा करण्यास, मंदिरात जाण्यास मनाई असते. साठवणीत असलेल्या पदार्थांना हात लावण्यास मनाई करण्यात येते. ज्यामध्ये लोणचं, पापड या गोष्टींचा समावेश होतो. आदिवासी संस्कृतीत प्रचलित असलेली कुर्मा प्रथा आदिवासी समाजामध्ये स्त्रियांबाबत भेदभाव करते. ही कुर्मा प्रथा नेमकी काय आहे? याचा विशेषतः स्त्रियांवर कसा परिणाम होतो? कुर्मा प्रथेबाबत लोकांचे मत काय आहे? जाणुन घेवुयात मॅक्स महाराष्ट्रच्या व्हिडीओच्या माध्यमातुन...
X
हिंदू धर्मात मासिक पाळी दरम्यान महिलांसाठी अनेक नियम बनवले आहेत. या नियमांनुसार, स्त्रीला मासिक पाळीत पूजा करण्यास , मंदिरात जाण्यास मनाई असते. साठवणीत असलेल्या पदार्थांना हात लावण्यास मनाई करण्यात येते. ज्यामध्ये लोणचं पापड या गोष्टींचा समावेश होतो.
आदिवासी संस्कृतीत प्रचलित असलेली कुर्मा प्रथा आदिवासी समाजामध्ये स्त्रियांबाबत भेदभाव करते. ही कुर्मा प्रथा नेमकी काय आहे? याचा विशेषतः स्त्रियांवर कसा परिणाम होतो? कुर्मा प्रथेबाबत लोकांचे मत काय आहे? जाणुन घेवुयात मॅक्स महाराष्ट्रच्या माध्यमातुन
तुमच्या आमच्या सारख्या अनेक महिलांच्या मनात अनेकदा प्रश्न पडला असेलच की जी गोष्ट स्त्रीला नवनिर्मितीची देते, ती गोष्टच अपवित्र का मानली जाते? ‘ती’ची मासिक पाळी अशुद्ध असेल तर मग तुमच्या -माझ्या शुद्धतेचं काय ? ‘ती’च्या गर्भातून आणि मासिक पाळीच्या चक्रामुळेच तर आपला जन्म झालाय! मग अश्या पवित्र गोष्टीला अपवित्र का मानले जाते ? मुळात काही सामाजिक प्रश्न आहेत जे अनेक गैरसमजांना जन्म देतात. यापैकी मासिक पाळी हा विषय आहे. मासिक पाळी ही प्रजनन प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची बाब असूनही महिलांना अजूनही सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागतो.
ग्रामीण भागातील अंधश्रद्धा
ग्रामीण भागात पाळी आलेल्या स्त्रीला बाहेर बसलेली, तिला करायचं नाही , अडचण आहे असे सुचक शब्द वापरले जातात. घरात स्त्रीला मासिक पाळी आली असेल तर तिला स्वयंपाक करण्यास मनाई असते. तिने स्वयंपाक केला तर तो विटाळ मानला जातो. मासिक पाळी आलेली असताना दारावर कोणी भिक्षा मागण्यास आले तर माफ करा असे म्हटले जाते. अशा स्त्री कडून भिक्षा स्वीकारली जात नाही. शेतात पिकांची पेरणी-लागण करताना, फळे काढताना, फळभाज्यांची फळे तोडताना मासिक पाळी आलेल्या स्त्रीला बोलावले जात नाही. तिचा स्पर्श झाला की झाड जळते, पिक उगवत नाही अशी अंधश्रद्धा आहे. धार्मिक कार्यक्रमात तिला हळदी कुंकू कार्यक्रमास, सवाष्ण कार्यक्रमात सहभागी होऊ दिले जात नाही.
ही प्रथा केवळ ग्रामीण आदिवासी भागातच नाही तर शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या काही सोसायट्यांमध्ये देखील आढळते. स्त्रियांना पाच दिवस ( रक्तस्राव सुरु असेपर्यंत) बाजुला बसवले जाते. या काळात तिला धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी नसते. स्वयंपाक घरात येण्यास मज्जाव असतो. या परंपरेच्या दबावातूनच लग्न धार्मिक विधी अथवा उत्सवामध्ये स्त्रिया मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी मार्केटमधील विविध गोळ्या औषधे खातात. समाजातील या प्रथेमुळे याच्याशी संबंधित औषध गोळ्यांचे एक मोठे मार्केट उभे राहिले आहे. यामागे मोठे अर्थकारण देखील आहे.या गोळ्या औषधांच्या दुष्परिणामांना स्त्रीलाच सामोरे जावे लागते.
मातृसत्ताक संस्कृतीने प्रेरित असलेल्या आदिवासी समाजात मासिक पाळीचा विविध समज आहेत.
आदिवासी संस्कृतीत प्रचलित असलेली कुर्मा प्रथा आदिवासी समाजामध्ये स्त्रियांबाबत भेदभाव करते. ही कुर्मा प्रथा नेमकी काय आहे? याचा विशेषतः स्त्रियांवर कसा परिणाम होतो? कुर्मा प्रथेबाबत लोकांचे मत काय आहे? जाणुन घेवुयात मॅक्स महाराष्ट्रच्या माध्यमातुन
कुर्मा प्रथा
काही आदिवासी संस्कृतींमध्ये मासिक पाळीच्या वेळी महिलांना दर महिन्याला घर सोडावे लागते. यासाठी गावाबाहेर खास झोपडी बांधण्यात येते. 'कुरमाघर' असे या झोपडीचे नाव आहे. या झोपड्या वारंवार धोकादायक आणि अस्वच्छ स्थितीत असतात. महिलांसाठी अशा झोपडीत राहणे अत्यंत आव्हानात्मक आणि अस्वस्थ करणारे आहे. तरीही महिलांनी ते केले पाहिजे कारण ही एक प्रथा आहे. गडचिरोली, रायगड, विजापूर, बस्तर आणि नारायणपूर यांसारख्या ठिकाणी आदिवासी गोंड आणि माडिया लोकसंख्या या सरावात गुंतलेली आढळते. शेतमजूर स्त्रीला मासिक पाळी आली असेल तर तिच्या स्पर्शाने फळबाग जळते, रोपांची लागण केल्यास झाड जळते असं मानलं जातं. तसेचं धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ देत नाही.
कुर्मा पद्धतीचे नकारात्मक परिणाम कोणते ?
“कुर्माघरात साप आणि विंचूच्या डंखामुळे महिलांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, “कुर्माघरात असलेल्या आजारी महिलांना रुग्णालयात जाणेही शक्य होत नाही. यामुळे इतर आजारांमध्ये वाढ होते आणि अस्वच्छतेमुळे संसर्ग होतात. एकट्या महिलांना भर वादळात, पावसात पोकळ अशा झोपडीत रहावे लागते. भिती आणि पाणी गळतीमुळे रात्री झोपू शकत नाही. "महिलांशी होणारी ही गैरवर्तणूक जोपर्यंत लोकांना संस्कृती, प्रथा आणि कुरूपता यातील फरक समजत नाही तोपर्यंत संपणार नाही.
सर्वच वर्तुळात मोकळेपणाने चर्चिल्या जात नसलेल्या या विषयावर माध्यमे बोलू लागली आहेत, ही नि:संशय चांगली गोष्ट आहे. चारचौघात खुलेपणाने न बोलल्या गेलेल्या या विषयावर वाहिन्यांवर चर्चा होऊ लागल्या आहेत, ही नक्कीच सकारात्मक बाब आहे. ही प्रथा पाळणाऱ्या जुन्या स्त्रिया तसेच पुरुषांची जबाबदारी वाढली आहे. काही स्त्रिया देखील स्त्रियांनाच कमी लेखणाऱ्या या परंपरेचे पालन करतात. गरज आहे या अंधश्रद्धेच्या विरोधात परिवर्तनाचे एक पाऊल टाकण्याची. ही जीर्ण रुढी संपवण्यासाठी तुम्ही हे पाऊल टाकाल ना ? मॅक्स महाराष्ट्र नेहमीच स्त्रियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.