चांदणी चौकाचा पुल का पडला नाही?:सतिष मराठे
X
पुण्याच्या चांदणी चौकातील बहुचर्चित पूल अखेर पाडला गेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असताना याच चांदणी चौकात वाहतूक कोंडीत अडकले होते त्यानंतर वाहतूक कोंडीचे कारण देत हा पूल पाडण्याचे आदेश देण्यात आले. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी सुद्धा या प्रक्रियेची हेलिकॉप्टरने पाहणी केली होती. 1992 मध्ये पंचवीस लाखात बांधलेल्या पुलाला पाडण्यासाठी दीड कोटी रुपये खर्च करण्यात आला 600 किलो स्फोटक यासाठी वापरण्यात आले. मात्र तरीसुद्धा पुलाचा काही भाग पडला नव्हता.
तो पूल बांधत असताना काय वेगळे तंत्रज्ञान वापरण्यात आले? बांधकाम प्रक्रियेत आधी असलेला दर्जा आता कमी झालेला का दिसतो? अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणाऱ्या नवीन व्यक्तींनी कोणती काळजी घ्यावी? या व अशा अनेक प्रश्नांसंदर्भात चांदणी चौकातील पूल यांनी बांधला त्या सतिष मराठे यांच्याशी खास बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...