Home > Election 2020 > येणाऱ्या काळात महिला मुख्यमंत्री पाहायला मिळेल का? पाहा काय म्हणाल्या पंकजा मुंडे
येणाऱ्या काळात महिला मुख्यमंत्री पाहायला मिळेल का? पाहा काय म्हणाल्या पंकजा मुंडे
Max Maharashtra | 17 Oct 2019 7:42 PM IST
X
X
सध्या परळी मतदारसंघात काय घडणार? या संदर्भात महाराष्ट्रात चांगलीच चर्चा आहे. भाजपच्या उमेदवार महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे राष्ट्रावदीच्या तिकीटावर मैदानात आहेत.
बीडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देखील येऊन सभा घेतल्या आहेत. त्यामुळे बीड मध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मध्यंतरी पंकजा मुंडे यांनी ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे’, असं म्हणत आपण मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत असल्याचं सूचक विधान केलं होतं.
त्यातच बीडच्या सभेत अमित शाह यांच्यासमोर देखील पंकजा मुंडे मुख्यमंत्री व्हाव्यात म्हणून घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे पंकजा मुंडे असो की कार्यकर्ते असो यांची मनिषा लपून राहिलेली नाही. या संदर्भात मॅक्समहाराष्ट्र च्या टीमनं त्यांना येणाऱ्या काळात महिला मुख्यमंत्री पाहायला मिळेल का? या संदर्भात प्रश्न विचारला असता.. पाहा काय म्हणाल्या पंकजा मुंडे
Updated : 17 Oct 2019 7:42 PM IST
Tags: amit shaah cm devendra fadanvis narendra modi PANKJA MUNDE vidhansabha vidhansabha-election-2019- अमित शहा नरेंद्र मोदी पंकजा मुंडे भाजप मुख्यमंत्री विधानसभा विधानसभा निवडणूक
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire