Home > मॅक्स व्हिडीओ > काय म्हणते डिजिटल दिवाळी ?

काय म्हणते डिजिटल दिवाळी ?

काय म्हणते डिजिटल दिवाळी ?
X

दिवसा गणित वाढत चाललेली महागाई पाहता यंदाच्या दिवाळीची खरेदी थोडी उशिरा चालू झाली. यंदाच्या दिवाळीवर महागाईचे सावट आहेच,परंतु कॅशलेस इंडिया ऑनलाइन शॉपिंग ॲप यामुळे बाजारपेठांमधील दिवाळीची खरेदी संमिश्र प्रतिसादाची दिसून येते.

ऑनलाइन शॉपिंग अॅप मुळे बाजारपेठ मधील बहुतांश गोष्टींची खरेदी ही ऑनलाइन स्वरूपातच केली जाते. यामध्ये चप्पल, सॅंडल, बूट, बॅग्स पर्स काही प्रमाणात कपडे, अगदी पणत्या देखील ऑनलाइन स्वरूपात शॉपिंग ॲप वर ग्राहकांन कडून घरबसल्या मागवल्या जातात. यामुळे प्रत्यक्ष रूपात बाजारपेठेत येऊन खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या थोडीफार कमी झाल्याचे काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

तर काही व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून ऑनलाइन शॉपिंग ॲपमुळे व्यवसायावर इतका काही परिणाम नाही असे देखील मत आहे. तर ग्राहकांनी देखील हे नमूद केलं की ऑनलाईन सगळेच प्रॉडक्ट मागवन हे काही योग्य आणि सोयीस्कर नाही काही गोष्टींची सत्यता त्याची क्वालिटी ही ऑफलाईन शॉपिंगच्या माध्यमातूनच कळते. यामुळे ऑनलाइन शॉपिंग ॲप च्या पसंती सोबतच पारंपारिक प्रत्यक्ष रूपातील खरेदी देखील करण्यावर आजही ग्राहकांचा जोर दिसून येतो.

ऑनलाइनच्या या युगामध्ये आर्थिक देवाणघेवाणी देखील ऑनलाइन स्वरूपात सुरू झाली आहे. पंतप्रधानांनी कॅशलेस इंडियाची घोषणा केल्यानंतर बहुतांश ठिकाणी ऑनलाइन स्वरूपातच व्यवहार केले जातात. मात्र अशा व्यवहारांच्या संदर्भामध्ये बाजारपेठांमध्ये संमिश्र मत असल्याचे समोर आले आहे. वयस्कर जुने अशिक्षित व्यापारी यांना ऑनलाईन स्वरूपामध्ये आर्थिक व्यवहार करणे हे मुश्किलीच आणि कटकटीच वाटत असल्याची प्रतिक्रिया समोर आल्या.

तर काही ठिकाणी मात्र आर्थिक व्यवहार देवानं घेवाण या ऑनलाइनच हव्या. याने व्यापार करतानाच्या सुट्ट्या पैशांचा संबंधीच्या अडचणी दूर होतात किंबहुना बँकेत जाऊन पुन्हा व्यापाराचे पैसे बँक खात्यांवर भरणे हा ताण देखील कमी होतो. अशा प्रतिक्रिया काही व्यापारांनी दिल्या. तर ऑनलाईन आणि ऑफलाईन या माध्यमातून व्यवहारांचा इतका काही परिणाम होत नाही अशा संमिश्र प्रतिक्रिया काही व्यापाऱ्यांकडून प्राप्त झाल्या. तर काही ग्राहकांनी देखील अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यानिमित्ताने दिवाळीवर महागाईचा काही परिणाम आहे का याच्या आढाव्यावरून असे स्पष्ट झाले की महागाईची झळ अद्यापही कमी झालेली नाही. तर ती दिवसागणित वाढत चालली आहे. याचाच परिणाम दिवाळीवर देखील होताना दिसतोय. मात्र दिवाळीच्या खरेदीच्या बाबतीत हे चित्र उलटे आहे. महागाई असली तरी दिवाळी हा एक मोठा सण वर्षातून एकदाच येतो म्हणून लोकांनी महागाईचा विचार न करता खरेदी करण्याला पसंती दिली आहे.

डिजिटायझेशनच्या या युगामध्ये. काही प्रमाणामध्ये दिवाळीची खरेदी ही डिजिटल पद्धतीने होत असताना दिसते. परंतु बहुतांश ग्राहक आणि व्यापारी हे पारंपारिक ऑफलाईन म्हणजेच प्रत्यक्ष स्वरूपातील खरेदीला पसंती देतानाच दिसतात याचमुळे बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी साठी वर्दळ आणि गर्दी दिसून येते.

पुण्यातील लक्ष्मी रोड परिसर हा विविध वस्तूंच्या खरेदीच एक मुख्य ठिकाण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लक्ष्मी रोडला बाजारपेठ भरते. याच लक्ष्मी रोडला यंदाच्या वर्षी 100 वर्षे पूर्ण होत असून. 1०१ वां वाढदिवस लक्ष्मी रोड चा साजरा करण्यात येत आहे. या निमित्य देखील सर्व व्यापारी आणि ग्राहकांनी शुभेच्छा देखील दिल्या.


Updated : 10 Nov 2023 4:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top