मोदींच्या काळात नक्षलवाद्यांचे काय झाले ?
X
भारतात नक्षलवाद्यांचा प्रभाव हा गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रासाठी मोठी समस्या बनला आहे.गरीब आणि पिछड्या लोकांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा नक्षलवाद्यांचा दावा फोल ठरतांना दिसत आहे. स्थानिक आदिवासी लोकांच्या मदतीने आपल्या कारवाईला अंजाम देणारे हे नक्षलवादी कायम सुरक्षा यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरत आलेले आहेत. याचमुळे १६ हजारांपेक्षा सुरक्षा जवान आणि सामान्य माणसांना आपला जीव गमवावा लागला. आणि या नक्सलग्रस्त भागाचा विकास सुद्धा थांबला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात या परिस्थितीत बरीच सुधारणा झाल्याचं पाहायला मिळते आहे. तसे आकडे सुद्धा केंद्राने जाहीर केले आहेत. पूर्वीच्या सरकारचे सुरक्षा धोरण बाजूला ठेवत नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात शांती, सुरक्षा आणि समृद्धी निश्चित करण्यासाठी तीन स्तरीय धोरण तयार करण्यात आलं...