बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झाली 'वळसंगची विहीर'
X
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. त्यामुळे चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला मोठं ऐतिहासिक महत्व प्राप्त आहे. अगदी तसंच महत्व सोलापूर जिल्ह्यातील वळसंग गावाच्या विहिरीला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः 24 एप्रिल 1937 रोजी या विहिरीचे लोकार्पण केले होते. चांदीची वाटी आणि रेशीमच्या दोरीने बाबासाहेबांनी या विहिरीतील पाणी काढुन प्राषन केलं होत. त्यानंतर ही विहीर दलित, शोषित, वंचित घटकांना पाणी पुरवठा करण्यासाठी उपलब्ध झाली. 1937 पासून सुरुवात झालेला या विहिरीचा झरा 1992 च्या दुष्काळातही आटला नाही, तो अद्याप विहिरीत अविरतपणे पाणी आहे, आज जवळपास 2000 लोकांची तहान ही विहीर भागवते. त्यामुळे या ऐतिहासिक विहिरीचे जागतिक दर्जाच्या स्मारकात रूपांतर व्हावं अशी मागणी वळसंगचे गावकरी करत आहेत.