पनवेल महानगर पालिकेत असणारे धामोले गाव पाण्यापासून वंचित...
X
नवीमुंबई आणि पनवेल महानगरपालिकेच्या सीमेवर असणारे धामोळे गाव मागील कित्येक पिढ्यांपासून पाण्यापासून वंचित आहे. हाकेच्या अंतरावर असणारी सिडको आणि पनवेल महानगर पालिकेच्या हद्दीतील हे गाव खारघर सारख्या आजच्या काळात अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण आसलेले शहराच्या लागून असलेल्या या गावात चार दिवसांनी पाण्याचा एक टॅंकर येतो, मात्र तेही पाणी पुरत नाही,शिवाय पाणी पिण्यायोग्य नसल्याचे येथील रहिवाशी सांगत आहेत,पाण्याची लाईन होती मात्र सिडकोने तोडली असल्याचा आरोप नागरिक करत आहेत,गावाच्या बाजूलाच लागून गोल्फचे मैदान आहे,तिथे मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होत असून,या गावचे पाणी जाणीव पूर्वक तोडले गेले असून आम्हाला इथून हकळण्याचा प्रयत्न असल्याचा येथील रहिवाशी सांगत आहेत,मात्र पिढ्यांपिढ्या आम्ही इथे राहिलो असल्याने इथून कुठेच जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले,मात्र एकविसाव्या शतकातील आणि आधुनिक युगातील हे नवीमुंबई आणि पनवेल महानगर पालिकेच्या सीमेवर असणारे गाव पाण्यापासून तडफडत आहे. येथील नगरसेवक आणि आमदार काहीच लक्ष देत नसल्याने फक्त राजकीय स्वार्थापोटी या आदिवासी लोकांचा वापर करून दुर्लक्ष करत असल्याने येथील रहिवाशी संताप व्यक्त करत आहेत...याच भयावह परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी...