Home > Election 2020 > उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्या युती झाल्यानंतरचा तो व्हिडीओ

उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्या युती झाल्यानंतरचा तो व्हिडीओ

उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्या युती झाल्यानंतरचा तो व्हिडीओ
X

लोकसभा निवडणुकीपुर्वी शिवसेना आणि भाजपची युती झाली. या युती दरम्यान भाजप अध्यक्ष अमित शाह तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या युतीच्या बोलणी नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीत काय ठरलं? हे सांगितलं. हे सांगताना त्यांनी सत्तेचं समसमान वाटप या शब्द वापरला होता. मात्र, मुख्यमंत्री पदा संदर्भात काहीही बोलले नव्हते.

तुम्हाला लाज कशी वाटत नाही

‘बाळासाहेबांची शपथ घेतो, खोटं बोलणार नाही!’

सरकारशी लढून मरु, पण आता आत्महत्या करणार नाही !

निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेने अशी बोलणी झाली असल्याचं सांगितलं. तर मुख्यमंत्र्यांनी असं काही घडलं नसल्याचं सांगितलं. त्यानंतर काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस च पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असं सांगत आहेत.

मात्र, उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्याशी युतीची बोलणी झाल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे आपल्या शिवसैनिकांना अमित शाह आणि त्यांच्यात झालेल्या बैठकीत नक्की काय ठरलं हे सांगतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचं समसमान वाटप असा जो शब्द वापरला होता. त्या शब्दाचा अर्थ देखील सांगतात. त्यामुळं अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय बोलणी झाली होती? आणि अमित शाह खरं बोलतात की, उद्धव ठाकरे खरं बोलतात. हे तुम्हाला समजण्यास नक्की मदत होईल...

वाचा नक्की काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

माझी त्यांच्याकडून त्यांना हिच अपेक्षा त्यांना सांगितली. की बाबा, युतीची 25 वर्ष आपण अनुभवली आहेत. संघर्षाची सुद्धा अनुभवली आहेत. तुम्हाल काय पटतंय ते बघा. ते सांगितल्यानंतर अर्थातच युतीची 25 वर्षे जी आली. सत्ता होती नव्हती पण सुखाची होती. कारण आपल्यामध्ये तशी काही खेचा ताण नव्हती. म्हणून काल जो काही आपण निर्णय घेतला आहे. त्याच्यामध्ये आपण लोकसभेच्या 22 जागा लढत होतो. त्याच्यामध्ये आणखी एक वाढवून घेतलीय. त्याच्यानंतर जे मुद्दे आपण उचलले होते, त्याचा निकाल आपण लावलेला आहे. मग तो शेतकऱ्यांचा असेल, आपल्या 500 फुटांचा आहे. नाणारचा मुद्दा आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत...

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री जे बोलले आहेत त्याचा अर्थ तुम्हाला नीट कळला का?

काय?

नाय समसमान जागा नाय...

समान जागा...

जबाबदाऱ्याचं अधिकाराचं समान वाटप

याचा अर्थ

मी त्याच्यामध्ये समानता आणलेली आहे. गेली 25 वर्षे आपण जे करत होतो की, ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री ते मी स्विकारलेलं नाही. आपलं जे स्वप्न आहे. आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी एक असं नेहमी म्हणतो आपण युद्धात जिंकलो आणि तहात हारलो. मला माहित नाही. तहात जिंकलो की हारलो तुम्ही ठरवायचं आहे.

नाही हा जर कालचा आपला तह असेल तहात हारलो की जिंकलोय. पुढची जबाबदारी तुमची आहे. मी अर्थातच शिवसेना प्रमुखांचं पूत्र म्हटल्यानंतर जे काही मी करीन माझ्या शिवसैनिकांच्या हिताचं करीन. याच्यामध्ये मी माझा कधीही स्वार्थ बघितलेला नाही. आणि बघतणार नाही. आणि शिवसैनिकांच्या आयुष्यात किती वर्ष संघर्ष संघर्ष करत बसायचं करायला लावायचं. मी लढ म्हटलं तर तुमची लढायची तयारी आहे तुमच्या सगळ्यांची...

तुमच्या भरवषावरच मी जे काही करतोय ते करणार आहे. म्हणून हा विश्वास हा प्रेम असंच ठेवा. आणि तुमच्या भरवशावरच मी शिवसेना आणि महाराष्ट्राला पुढं घेऊन जातो.

Updated : 15 Nov 2019 12:06 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top