साता समुद्र पार शिवजयंती साजरी
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्लोषात केवळ महाराष्ट्रात आणि देशात नाहीतर विश्वभरात साजरी करण्यात आली. पूर्व आफ्रिकेतील युगांडामध्ये शिव जयंती अशी साजरी झाली.
X
पूर्व आफ्रिकेतील युगान्डा देशात वसलेल्या आणि कामानिमित्त येथे स्थायिक झालेल्या काही महाराष्ट्रीयन कुटुंबांनी एकत्र येऊन २७ वर्षांपूर्वी महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली महाराष्ट्र मंडळ कंपाला ही मराठी बंधुभागीनींची नोंदणीकृत संस्था आहे.१०० महाराष्ट्रीयन कुटुंब मंडळाचे सभासद आहेत. आज महाराष्ट्र मंडळ कंपला हे ५०० हूनही अधिक सभासदांचे एक एकत्र कुटुंब बनले आहे. दरवर्षीमहाराष्ट्र मंडळ गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करतो आणि यंदा महाराष्ट्र मंडळ कंपाला पहिल्यांदाच अतिशय उत्साहात शिवजयंती साजरी करत आहे.
महाराजांचे २५ फुटी भव्य तैलचित्र आणि महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण भारताचे उच्च आयुक्त श्री अजय कुमारजी यांच्या हस्ते होणार आहे. आज शिवजयंतीच्या निमित्ताने आर्य समाज येथे महायज्ञाचे आयोजन केले आहे. ह्या कार्यक्रमात भारतीय वंशाच्या अमराठी भारतीयांचा सुद्धा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाला ५०० हुन अधिक लोकं हजेरी लावणार आहेत. मंडळाचे अध्यक्ष श्री सुधीर बलसुरे आणि त्यांचे सहकारी ह्या कार्यक्रमांची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत.ह्या शिवजयंतीच्या निमित्ताने नवीन पिढीला शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी माहिती करून देणाऱ्या कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन केलेला आहे. ढोल ताशांच्या गजरात महाराष्ट्र मंडळ महाराजांना आदरांजली देत आहे.