Home > मॅक्स व्हिडीओ > शरद पवार - बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणामुळे शिवाजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय

शरद पवार - बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणामुळे शिवाजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय

शरद पवार -  बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणामुळे शिवाजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय
X

पुणे - दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींच्य़ा लिहिलेल्या इतिहासावरुन पुन्हा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली आहे. डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या शिवचरित्र ग्रंथ पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. माझ्या मते बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणामुले शिवछत्रपती यांच्यावर इतका अन्याय कोणी केला नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाचे प्रकाश शरद पावर याच्या हस्ते झाला. "शिवचरित्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या बाबासाहेबांच्या लिखाणातून छत्रपती शिवजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय झाला, अन्य घटकांचे महत्व वाढवण्याचे काम त्यांनी केलं. मात्र रामदासांचे योगदान काय, दादोजी कोंडदेवांचे योगदान काय? शिवाजी महाराजांना ज्यांनी दिशा दाखवली त्या फक्त जिजाऊ होत्या" असे शरद पवार यांनी म्हटले आहे.


Updated : 23 July 2022 8:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top