CAB: हिंदूराष्ट्राकडे वाटचाल! - निखिल वागळे
X
नागरिकत्व संशोधन विधेयक (Citizenship Amendment Bill) संसदेच्या दोन्हीही सभागृहात पारित करण्यात आलं आहे. या विधेयकाच्या चर्चासत्रादरम्यान भाजप (BJP) पक्ष आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) या विधेयकासंदर्भात प्रश्नांची अपेक्षित उत्तर देण्यात पुर्णपणे असमर्थ ठरले आहेत. मात्र, केवळ संख्याबळाच्या जोरावर हा कायदा लागू करण्यात आल्याची टीका सर्वत्र होताना दिसते आहे.
भाजप या कायद्याच्या माध्यमातुन मुस्लीम समुदायावर सर्रासपणे निशाणा साधत आहे. भारताची शेजारील राष्ट्र पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणीस्तान येथुन आलेल्या पिडीत अल्पसंख्यांक समुदायांमधून जाणीवपुर्वक मुस्लीम समाजाला वगळण्यात आलं आहे.
नागरिकत्व संशोधन विधेयक म्हणजे भारताची हिंदूराष्ट्राकडे होणारी वाटचाल आहे का? भाजप मुस्लीमद्वेषी राजकारण करत आहे का? या विधेयकाचा इतिहास काय आहे? भाजप आणि संघ कशा पद्धतीने इतिहासाला आपल्या सोयीप्रमाणे बदलून आपला हेतू साध्य करत आहे का? याविषयी जाणुन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagale) यांचं रोखठोक विश्लेषण नक्की पाहा...
https://youtu.be/oSdsCL3jk10?list=PLYzfrEoYtXr6B7SCw4SioyXXmJ50fFIem