सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील तीनशे लोकाचं स्थलांतर
टीम मॅक्स महाराष्ट्र | 12 July 2022 8:08 AM IST
X
X
सांगली जिल्ह्याच्या चांदोली परिसरात अतिवृष्टी सुरू आहे. मागील 24 तासात 120 मिली मीटर पाऊस झाला आहे. शिराळा तालुक्यातील अनेक वाड्याना मागील वर्षी पासून भूस्खलनमुळे धोका निर्माण झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, मनदुरच्या मिरखेवाडी आणि आरळाच्या कोकणेवाडी आणि बाष्टे वस्ती येशील 300 लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. शासना मार्फत एका मंगल कार्यलयात स्थलांतरित ग्रामस्थांना निवास आणि भोजनाची सोय करण्यात आली आहे. ह्या वाड्या डोंगरावर असून नेहमी या ठिकाणी जोरदार पाऊस होत असतो. दरवर्षी या लोकांना पावसाळ्यात स्थलांतरित व्हावे लागते, त्यामुळे याना कायम स्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.
Updated : 12 July 2022 8:43 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire