Home > मॅक्स व्हिडीओ > धर्मनिरपेक्ष तत्वाचा RSS ला इतका राग का?

धर्मनिरपेक्ष तत्वाचा RSS ला इतका राग का?

घटनात्मक पदावर असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना राज्यपालांनी एका विशिष्ट धर्माचे काम करा असं म्हणणं योग्य आहे का? राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना त्यांनी घेतलेल्या संविधानाच्या शपथेचा विसर पडला का? राज्यपाल पदावर असलेल्या व्यक्तीचा धर्म कोणता? पाहा लेखिका मुग्धा कर्णिक यांचे विश्लेषण

धर्मनिरपेक्ष तत्वाचा RSS ला इतका राग का?
X

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद महाराष्ट्राला नवीन नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील प्रार्थनास्थळं बंद ठेवण्यात आली आहेत. भाजप, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी मंदीर उघडण्यावरुन महाविकास आघाडी सरकारला लक्ष करत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या वादात उडी घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र लिहून मंदीरं उघडण्याची मागणी केली होती.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहून माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे. हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. असं म्हणत राज्यपालांना खास ठाकरे शैलीत उत्तर दिलं आहे. त्यानंतर भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

मात्र, या सर्व पार्श्वभूमिवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करुन देणं योग्य आहे का? राज्यपालांना घटनात्मक पदाचं भान राहिलं आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. य़ा संदर्भात लेखिका मुग्धा कर्णिक यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बातचित केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भुमिकेचं स्वागत करत, भारताचं संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान आहे. अशा या संविधानातील धर्मनिरपेक्ष तत्त्वाचा RSS ला इतका राग का? असा सवाल केला आहे....

पाहा काय म्हणाल्या लेखिका मुग्धा कर्णिक...



Updated : 15 Oct 2020 4:17 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top