Home > मॅक्स व्हिडीओ > पुरंदरे हेच खरे जेम्स लेन : इतिहास संशोधक कोकाटे यांची टीका

पुरंदरे हेच खरे जेम्स लेन : इतिहास संशोधक कोकाटे यांची टीका

पुरंदरे हेच खरे जेम्स लेन : इतिहास संशोधक कोकाटे यांची टीका
X

बा.म.पुरंदरे हेच खरे जेम्स लेन असून जेम्स लेन यांच्या पुस्तकाची पाळे मुळे ही पुरंदरे यांच्या पुस्तकात आहे .जेम्स लेन हा काय पुरंदरेच्या वकील आहे का ? लेन ने भारतात यावं आणि खुलेआम चर्चा करावी ,तुम्ही शिवीगाळ करून परदेशात पळून जाणार हे कुठल्या शिष्टाचारात आहे, पुरंदरे हाच खरा जेम्स लेन आहे ,पुरंदरे यांचे समर्थन करणारा हा महाराष्ट्राचा शत्रू असू शकतो आणि तो शिवद्रोही असू शकतो अशी खरमरीत टीका पुरंदरे यांचे समर्थन करणार्यावर इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी कल्याण (मोहने) येथे एका कार्यक्रमात केली आहे.

श्रीमंत कोकाटे कल्याण नजीक मोहने येथे आयोजित एका कार्यक्रमात व्याख्यानासाठी आले होते. कल्यान जवळ मोहने येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तर्फे छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा ज्योतिबा फुले ,डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. शिवराय ते भीमराय विचारांचा वारसा या विषयावर प्रख्यात इतिहास अभ्यासक डॉ श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते .

यावेळी बोलताना कोकाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवास ,त्याचे कार्य उलगडले. शिवराय भीमराय रडणारे नव्हते ,लढणारे होते अनेक संकटे आली मात्र ते डगमगले नाहीत संकटसमयी ते लढले ,लढणारी माणसं आयुष्यात यशस्वी होतात असे सांगितले .

व्याख्यानादरम्यान विविध उदाहरणांच्या माध्यमातून अंधश्रद्धेवर प्रहार करताना स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवण्याचं आवाहन कोकाटे यांनी केलं. कार्यक्रमानंतर जेम्स लेन याने यानी मी बाबासाहेब पुरंदरे यांना कधीही भेटलो नव्हतो, वा त्यांच्याशी कधीही चर्चा केली नव्हती,' असा दावा केला याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता कोकाटे यांनी पुरंदरे यांचे समर्थन करणार्यांवर जोरदार टीका केली .याबाबत बोलताना कोकाटे यांनी बाबासाहेब पुरंदरे प्रत्यक्ष जेम्स लेनला भेटले किंवा प्रत्यक्ष कानामध्ये सांगितलं हे महत्त्वाचं नाही तर पुरंदरेनी इतिहासाची मांडणी केलेली आहे ते आक्षेपार्ह आहे. शहाजीराजे हजर असताना त्यांना सतत गैरहजर दाखवणे आणि रामदास व दादोजी कोंडदेव हे गुरू मार्गदर्शक शिक्षक नसताना त्यांना सतत शिवराय व जिजाऊंसमवेत दाखवणारे अत्यंत घृणास्पद काम पुरंदरे यांनी केल्याची टिका केली .

जेम्स लेन यांच्या पुस्तकाची पाळे मुळे ही पुरंदरे यांच्या पुस्तकात आहे .जेम्स लेन हा काय पुरंदरेच्या वकील आहे का असा सवाल केला .लेन याने भारतात यावं आणि खुलेआम चर्चा करावी ,तुम्ही शिवीगाळ करून परदेशात पळून जाणार हे कुठल्या शिष्टाचारात आहे, पुरंदरे हाच खरा जेम्स लेन आहे ,पुरंदरे यांचे समर्थन करणारा हा महाराष्ट्राचा शत्रू असू शकतो आणि तो शिवद्रोही असू शकतो त्यामुळे जे कोणी पुरंदरे समर्थन करतायत हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अप्रत्यक्षपणे दुरान्वयाने बदनामी करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे अशी टीका पुरंदरे यांचे समर्थन करणाराण्यांवर केली असे डॉ श्रीमंत कोकाटे शेवटी म्हणाले.

Updated : 28 April 2022 3:20 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top