लॉकडाऊनविरोधातील सत्याग्रहाची सुरूवात पंढरपुरातून : प्रकाश आंबेडकर
X
राज्यातील लॉकडाऊन उठवावे आणि मंदिरं देखील करावीत अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिर भक्तांसाठी खुले करावे यासाठी 31 ऑगस्टला पंढरपुरात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. तसेच आपण स्वत: या आंदोलनात सहभागी होणार आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे सरकारने लॉकडाऊन लागू केले आहे. अनलॉकच्या विविध टप्प्यांमध्ये काही उपक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. पण राज्यात आता लॉकडाऊन उठवावे अशी मागणी प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांना लावून धरली आहे. या मागणीसाठी देशात लॉकडाऊन विरोधातील पहिले आंदोलन प्रकाश आंबेडकर यांनी 12 ऑगस्ट रोजी केले. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी निदर्शने केली होती.
त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी 15 ऑगस्टपर्यंत सरकारने निर्णय न घेतल्यास वंचित बहुजन आघाडी (Vanchit bahujan aaghadi) आंदोलन तीव्र करेल, असा इशारा त्यांनी दिला होता. लॉकडाऊनमुळे (Lockdown) गरिबांचे हाल होत आहेत. अनेकांचे रोजगार गेले आहेत. तसंच ज्यांच्या नोकऱ्या आहेत त्यांना लोकल आणि एसटीही बंद असल्याने त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे सरकारने आंतर जिल्हा बसेस सुरू कराव्यात अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.