नागरिकांचे बेजबाबदार वर्तन, बंदी असतानाही धबधब्यावर प्रचंड गर्दी
X
राज्यात डेल्टा प्लसचा धोका वाढलेला आहे. काही ठिकाणी पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यात ठाणे जिल्हा देखील असून मुंब्रा शहराचाही समावेश आहे. असे असतानाही गेली धबधब्यावर लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. पण मुंब्रा पोलिसांनी या ठिकाणी कारवाई केलेली नाही.
ठाण्यातील मुंब्रा येथे मुंब्रा देवी डोंगरावर अतिशय नयनरम्य अशा धबधब्याकडे तिथून जाणारे सर्व जण नेहमी आकर्षित होत असतात. एवढंच नाही तर पावसाळ्यात दररोज आणि विशेष करून सुट्टीच्या दिवशी आणि रविवारी या धबधब्यावर पर्यटक प्रचंड गर्दी करतात. पण सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे राज्यात कलम 144 म्हणजेच जमावबंदीचा आदेश लागू आहे… शिवाय ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार ठाण्यातील सर्वच धबधबे, नद्या, तलाव आणि पर्यटन स्थळे या सर्वच ठिकाणी नागरिकांना जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे… असं असताना देखील मुंब्रा बायपास वरील मुंब्रा देवी डोंगरातील धबधब्यावर रविवारी सकाळपासूनच नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. धक्कादायक म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जात नसून एकाही नागरिकाने मास्क घातलेला नाहीये… यामुळे मुंब्र्यात जमावबंदीचे आदेश किंवा पर्यटनस्थळांवर जाण्यास मनाई आदेश लागू होत नाही का? असा देखील प्रश्न निर्माण होतोय…