पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदासाठी भरपावसात देवी-देवतांना साकडे
X
राज्यातील सत्तापेच आता न्यायालयात अडकला असताना मंत्रिमंडळ विस्तार लांबत आहेत.. मंत्रिपदासाठी इच्छुकांचे नानावीध प्रयत्न सुरु आहेत. सातत्याने डावलण्यात आलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळ स्थान मिळावे याच्यासाठी भाजपचे पदाधिकाऱ्यांनी मोहटादेवीला लोटांगण घातल्यानंतर आता भालचंद्र गणपतीला साकडे घातले आहे..
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळ स्थान मिळावे याच्यासाठी बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी यांनी भालचंद्र गणपतीला पायी दिंडी काढली आहे त्याचबरोबर पंकजा मुंडे यांना अनेक वेळा मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं मात्र यावेळेस त्यांना मंत्रिमंडळ असताना मिळावं याच्यासाठी बीड जिल्ह्यातील जे पदाधिकारी आहेत कुणी पांडुरंगाला साकडं घालतोय.... तर कोणी मोहटादेवीला पायी चालत साकडं घालतोय तर आज लिंबागणेशच्या भालचंद्र गणपतीला पायी चालत साकडं घातलं आहे पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या खंबीर नेत्या आहेत ज्या वेळेस पालकमंत्री होत्या त्यावेळेस त्यांनी बीड जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला व तो सतमार्गी लावला मात्र यावेळेसही पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळ स्थान मिळावं याच्यासाठी भाजपचे पदाधिकारी यांनी भालचंद्र गणपतीला साकडे घालून पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं याच्यासाठी पावसात भिजत पायी वारी केली आहे.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना मंत्रिमंडळ स्थान मिळावं... मंत्री पद मिळावं... याच्यासाठी आम्ही सर्व भाजप पदाधिकारी
पंकजाताई मुंडे यांना मंत्रिमंडळात नक्कीच स्थान मिळेल त्याचबरोबर त्यांना मंत्री पदाची लवकरच शपथ मिळेल अशी आम्ही अपेक्षा करत आहोत. आम्हाला नक्कीच विश्वास आहे की पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल. आम्हाला ठाम विश्वास आहे की पंकजा मुंडे यांना मंत्रीपद मिळेल. नक्कीच आमच्या भक्तीमध्ये शक्ती आहे आणि ताईंना मंत्रिपद मिळेल हा आमचा विश्वास आहे, असे भाजप पदाधिकारी सांगताहेत.
आम्ही भालचंद्र गणपतीला साकडे घालण्यासाठी निघालेलो आहोत पंकजाताई यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं याच्यासाठी आम्ही सर्व भाजप पदाधिकारी आज गणपतीला साकडे घालण्यासाठी निघालेलो आहोत. बीड जिल्ह्याचा विकास होण्यासाठी पंकजाताई मुंडे यांना मंत्रीपद द्यावच लागेल.. नाहीतर पक्षाला सुद्धा त्याचं फार मोठं नुकसान होणार आहे पक्षश्रेष्ठी हे आमच्या ताईचा नक्कीच विचार करणार आहेत नक्कीच यावेळेस पंकजाताई मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल.
असे भाजप पदाधिकाऱ्यांना वाटत आहे.
पंकजाताई मुंडे यांना मंत्रिमंडळ असताना मिळावा म्हणून आम्ही सगळ्या तळागाळातील महिला आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळ स्थान मिळावं म्हणून मोठा देवी ला साकडे घालण्यासाठी आम्ही पायी दिंडी काढली आहे पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी आमची महिला शक्ती खंबीरपणे उभा राहणार आहे त्याच्यामुळे पंकजाताई मुंडे यांना नक्कीच मंत्रिपद मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा आम्हाला विश्वास आहे.
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपच्या राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचे मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे म्हणून आज जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेची इच्छा आहे की,पंकजाताई मुंडे यांचे मंत्रिमंडळ स्थान मिळावं व मंत्रिमंडळात नाव समावेश व्हावं हीच भावना घेऊन आज भाजप पदाधिकारी यांनी पायी दिंडी काढली आहे,भाजप तालूकाध्यक्ष सुधिर घुमरे म्हणाले.