Home > मॅक्स व्हिडीओ > Bharat Jodo Yatra : मोदी समर्थकांचा भारत जोडो यात्रेला पाठींबा

Bharat Jodo Yatra : मोदी समर्थकांचा भारत जोडो यात्रेला पाठींबा

Bharat Jodo Yatra : मोदी समर्थकांचा भारत जोडो यात्रेला पाठींबा
X

राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यापार्श्वभुमीवर पुणे शहरातून मोदी समर्थकांनी भारत जोडो यात्रेला समर्थन दिले आहे. नेमकं मोदी समर्थकांनी राहुल गांधी यांना समर्थन का दिले? जाणून घेण्यासाठी पहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी गौरव मालक यांचा रिपोर्ट...

राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रा (Bharat jodo Yatra) सुरू केली आहे. या यात्रेला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. त्यापार्श्वभुमीवर पुणे शहरातील युवक क्रांती दलाने (Yuvak Kranti Dal) भारत जोडो यात्रेला पाठींबा देण्यासाठी पदयात्रेचे आयोजन केले होते.

देशात वाढत असलेली महागाई (Inflation), बेरोजगारी (Unemployment), महिला सुरक्षा (Woman Safety), आर्थिक विषमता या मुद्द्यांवरून आवाज बुलंद करण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेचे आयोजन केले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या लढाऊ वृत्तीमुळे आम्हाला त्यांचा अभिमान आहे, अशी प्रतिक्रीया नागरिकांनी व्यक्त केली.

या पदयात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना मतदान केलेला आणि एकेकाळचा मोदी समर्थकाने भारत जोडो यात्रेला पाठींबा असल्याचे मत मांडले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, आम्ही 2014 मध्ये मोदींना मतदान केलं. मात्र त्यांनी दिलेले आश्वासन पोकळ ठरले व आमचा भ्रमनिरास झाला, अशी भावना देखील या यात्रेत सहभागी असलेल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.

ज्या भागातून ही यात्रा जाऊ शकत नाही, अशा भागात हा विचार पोहोचणे महत्त्वाचं आहे. म्हणून पुणेकरांसाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलं असल्याचं लोकांनी सांगितलं आहे.



Updated : 18 Nov 2022 4:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top