'राज' ची महाविकास आघाडी वर चुप्पी !
X
आज मनसेचा चौदावा वर्धापन दिन. या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता राज ठाकरे यांनी मनसेचा वर्धापनदिन वाशी येथे पार पाडणार पडला. २३ जानेवारी २०२० रोजी मुंबईत पक्षाचं पहिलं राज्यव्यापी अधिवेशन झालं होतं. त्यावेळी राज ठाकरे यांनी पक्षाचा झेंडा बदलला होता. त्यानंतर आज होणाऱ्या या अधिवेशनात महाविकास आघाडीच्या सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर ते नक्की काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर कोणतीही टीका केली नाही. जाहीर करण्यात आलेल्या शॅडो कॅबिनेट बाबत राज यांनी पक्षातील नेत्यांना सूचना केल्या.
महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी आणि समाजगटांसाठी काम करणारं ही खाते आहेत.
सरकारचं वाभाडे जिथे काढायचे आहेत. तिथे वाभाडे काढा आणि जिथे सरकार चांगलं काम करेल तिथं त्यांचं अभिनंदन पण करा. अशा सूचना यावेळी राज यांनी शॅडो कॅबिनेटला दिल्या.
आरटीआय टाकून कोणाला ब्लॅकमेल करु नका. परस्पर पत्रकार परिषदा घेऊ नका. प्रतिरूप मंत्रिमंडळाच्या बाबतीत पक्षाचे पदाधिकारी नसलात पण तुम्हाला एखाद्या विषयात काम करायची इच्छा असेल तर त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा. मी तुम्हाला ह्या कामात सहभागी करून घेईन. असं म्हणत कार्यकर्त्यांना सूचना केल्या.
गेल्या 14 वर्षाच्या पक्षाच्या काळात आपण अनेक कामं केली, तरीही मतदानाच्या वेळेस लोकं कुठे जातात हे कळत नाही, लोकांना कामाच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत, पण मतदान आम्हाला नाही करणार ह्याला काय अर्थ आहे? असं म्हणत खंत देखील व्यक्त केली.
यावेळी काँग्रेसची केंद्रात सत्तेत होती आज दिल्लीत एकही आमदार निवडून नाही आला. हे प्रकार होत असतात. जेंव्हा देशात लाट असते तेंव्हा अनेक पक्षांना पराभव स्वीकारावा लागतो. तरी पण मलाच विचारतात की तुमचा पराभव का झाला? असा सवाल करत लोकांच्या पक्षांकडून अपेक्षा आहेत. याबाबत भाष्य केलं.
https://youtu.be/ye5W1I2X8kM