Home > मॅक्स व्हिडीओ > Marathwada अनुशेष असताना मराठवाड्याचा अमृतमहोत्सव कोणत्या तोंडाने साजरा करणार? ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख

Marathwada अनुशेष असताना मराठवाड्याचा अमृतमहोत्सव कोणत्या तोंडाने साजरा करणार? ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख

Marathwada अनुशेष असताना मराठवाड्याचा अमृतमहोत्सव कोणत्या तोंडाने साजरा करणार? ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख
X

निजामाच्या जुलमी राजवटीतून १९४८ मध्ये मुक्त झालेल्या मराठवाडा च्या अमृत महोत्सवी वर्षाची सुरूवात यंदा होत असल्याने मंत्रीमंडळ उपसमिती नेमून कार्यक्रम ठरविले जात आहेत. मराठवाड्याला आजही पाणीटंचाई ला सामोरे जावे लागते. सिंचन व्यवस्था अद्यापही बळकट नाही. काही शहरांना गेले महिनाभर पिवळसर पाणी प्यावे लागत आहे. मे महिना असूनही ऊस गाळपाअभावी शिल्लक आहे. उद्विग्न शेतकरी आत्महत्या करत आहेत. बाहेरचा ऊस गाळप करून भागधारक शेतकऱ्यांचा मात्र मागे का ठेवला याचा जाब विचारण्यास कोणी तयार नाही. हा व इतर अनेक प्रकारचा अनुशेष बाकी असलेला मराठवाडा अमृत_महोत्सव कोणत्या तोंडाने साजरा करणार ? आतापर्यंत शोषण झालेल्या मराठवाड्याच्या अमृतमहोत्सवाला रक्तदानाची अपेक्षा कशी करता अशा शब्दात ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख यांनी सडेतोड भाष्य केलं आहे.


Updated : 14 May 2022 8:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top