Home > मॅक्स व्हिडीओ > Manoj Jarange on Chhagan Bhujbal | मनोज जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर

Manoj Jarange on Chhagan Bhujbal | मनोज जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर

Manoj Jarange on Chhagan Bhujbal | मनोज जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर
X

राज्य सरकारला मनोज जरांगे यांचं उपोषण तात्पूरतं सोडवण्यात यश आलं असलं, तरी आजही आरक्षणाची ठिणगी थांबलेली नाही. सत्ताधारी नेत्यांकडून आरक्षण भरकटवण्याचा प्रयत्न होतं असल्यानं मराठा आरक्षण पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलाय. छगन भुजबळांनी मराठा आरक्षणासह आंदोलनावर उपस्थित केलेल्या प्रश्नांना आता मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, तथा मंत्री छगन भुजबळ यांनी माजलगाव येथे आमदार प्रकाश सोळंके आणि बीड येथे समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांची भेट घेतली. मराठा आरक्षण आंदोलनात सोळंके यांच्या घराला आणि राऊत यांच्या हॉटेलला आग लावण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी शहरात पत्रकार परिषद घेतली. मराठा आरक्षण आणि आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले. OBC आरक्षण वेगळं ठेवा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या, ही माझी भूमिका असल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट केलंय.

ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी करेंगे या मरेंगे असं भुजबळ बोलले. त्यांच्या पोटात होते ते ओठात आले. या प्रकारचं वक्तव्य म्हणजे हिंसेला उत्तेजन आहे, अशी टीका जरांगे यांनी केली. ‘धनगर आणि ओबीसींवर भुजबळ बोलत आहेत. पण, उपोषण करणारे धनगर बांधव मरायची वेळ आली असताना भुजबळ चौंडी येथे किती वेळा भेटायला गेले. राजकीय फायद्यासाठी त्यांना धनगर, ओबीसी, बांधवांची आठवण येते. बीड येथील जाळपोळीचे कधीही समर्थन केले नाही. पोलिस हातावर हात देऊन उभे राहिल्याचं भुजबळ म्हणाले. त्यांनी विनाकारण पोलिसांवर टीका करू नये’, असे जरांगे म्हणाले.

मराठा आरक्षणामुळे ओबीसींचे आरक्षण संपणार नाही. मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळणार आहे. मराठा आणि ओबीसी यांच्यात जिवाभावाचे संबंध आहेत. आरक्षण देण्याची इच्छा नसल्यामुळं छगन भुजबळ यांची केविलवाणी राजकीय धडपड सुरू आहे. भुजबळ म्हणाले तरी ओबीसी मराठा आरक्षणाला विरोध करणार नाहीत. भुजबळांनी केलेल्या आरोपामागे केवळ राजकारण आहे, असे प्रत्युत्तर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी भुजबळ यांच्या टीकेला दिले.

Updated : 8 Nov 2023 7:01 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top