कृषी कायद्याविरोधात महाराष्ट्रातही ठराव करा: किसान सभा
X
महिना उलटूनही कडाक्याच्या थंडीत राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी असलेल्या किसानसभेने केरळच्या धर्तीवर महाराष्ट्रातही शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधात ठराव मंजूर करावेत अशी मागणी किसान सभेचे डॉ. अजित नवलेंनी केली आहे. केरळ सरकारने भाजीपाला आणि नाशवंत शेतीमालाला आधारभावाचे संरक्षण देण्याची कारवाई केरळ सरकारकडून करण्यात आली आहे. सर्व राज्य सरकारांनी कृषी कायद्यांविरोधात ठराव आणि राज्य स्तराववर नाशवंत शेतमालाला भावाचे संरक्षण देण्याची कारवाई करावी, अशी मागणी किसान सभेने केली आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट आधारभावाचे रास्त संरक्षण द्या, केंद्र सरकारने केलेले तीन शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, शेतकरी विरोधी वीजबिल विधेयक पुढे रेटण्याचे कारस्थान बंद करा. या प्रमुख मागण्यांसाठी सुरू असलेल्या आपल्या अन्नदात्यांच्या या आंदोलनात देशभरातील जनतेने प्रचंड संख्येने सहभागी व्हावे., असे आवाहन किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.