Home > मॅक्स व्हिडीओ > मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लागले कामाला, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लागले कामाला, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लागले कामाला, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन
X

विश्वास दर्शक ठऱाव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळीच कामाला सुरुवात केली आहे. राज्यात सुरू झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपण सकाळी सात वाजताच वरिष्ठ सचिवांशी चर्चा केली, तसेच ठाणे,रायगड,पालघर,रत्नागिरी, कोल्हापूर,सांगली तसेच सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांना सूचना केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ठाणे इथल्या निवास स्थानातून बाहेर पडताना मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना याबाबतची माहिती दिली.

जे पालक सचिव आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यांमध्ये जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घ्यावा, कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी देखील सूचना दिलेल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. कुठल्याही प्रकारच्या दुर्घटना घडू नये यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत,ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होईल तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. तसेच ज्या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडतील त्या ठिकाणच्या लोकांना सुरक्षित सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या महापुजेचा मान मिळणार आहे, याबद्दल आपण स्वतःला भाग्यवान समजतो, अशीही प्रतिक्रिया त्यांनी ठाणे इथल्या निवास स्थानातून बाहेर पडताना पत्रकारांना दिली.

Updated : 5 July 2022 8:32 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top