पावसात लोकांचे झाले हाल, सरकारी मदत पोहचली का ?
X
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घातलं आहे. कोकणात तर महापुराचा धोका ठिकठिकाणी वाढत चालला आहे. आधीच रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात परिस्थिती गंभीर असताना आता सिधुदुर्ग जिल्ह्याला सुद्धा हवामान खात्याने पुढील पाच दिवस सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कोकणात अऩेक ठिकाणी भूस्खलन होत आहे. कोकणातील लोकांना या कठीण परिस्थिती सरकारच्या मदतीच्या हाताची गरज आहे. ही मदत पोहोचते आहे का लोकांना कोणकोणत्या मदतीची गरज आहे. ग्राउंड झिरोवर नक्की काय परिस्थिती आहे. या संदर्भात मॅक्समहाराष्ट्र चे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी 'टू द पॉइंट' राजकीय नेत्यांशी चर्चा केली. यावेळी वैभव नाईक यांनी कोकणात होत असलेल्या भूस्खलनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बातचीत केल्याची माहिती प्रेक्षकांना दिली.
या चर्चेत माजी खासदार हुसेन दलवाई, भाजपचे नेते माधव भंडारी देखील सहभागी झाले होते.
कोकणाला सरकारने नेहमीच दुजाभाव वागणूक दिली असून सरकारी पातळीवर कोणतंही नियोजनबद्ध काम होत नाही असं हुसेन दलवाई यांनी या चर्चेत म्हटलं आहे. यासाठी कोकणातील राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव आणला पाहिजे असंही ते म्हणाले. कोकणातील विकासाला हव्या त्या पद्धतीने पाहिलं गेलं नाही. असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
तर दुसरीकडे सध्या कुणी मदत केली? कुणी नाही? यापेक्षा आता लोकांना तातडीने कोणत्याही पातळीवर पाणी आरोग्य अन्न अशी सेवा केली पाहिजे. असं मत माधव भंडारी यांनी व्यक्त केलं आहे.
या चर्चेत कोकणातील समस्यांवर कायम स्वरूपी काय उपाययोजना राबवता येतील? सध्या काय स्थिती आहे? भविष्यात काय रोडमॅप असायला हवा? या विषयावर आढावा घेण्यात आला. पाहा या नेत्यांनी कोकणाच्या समस्यांसदर्भात मांडलेले मुद्दे