शेतकऱ्यांच्या मालाचे कोणतेही नुकसान होता कामा नये : खा. धैर्यशील माने
X
राज्यात कोरोना चा विळखा वाढत चालला आहे. विशेष बाब म्हणजे ग्रामीण भागात देखील कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यात कोरोनाने डोकं वर काढलं आहे. या संदर्भात खासदार धैर्यशील माने यांची आढावा बैठक पार पडली.
याबैठकीला तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डाॅ. अनिल बागल, सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य संपतराव देशमुख, माजी सदस्य अभिजीत पाटील, नगराध्यक्षा अर्चना शेटे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, आरोग्य विभागाचे डाॅ. प्रविण पाटील उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यात मुंबई पुण्याहून आलेले साधारणतः ९५०० च्या वर लोक आहेत. यावेळी खासदार धैर्यशिल माने यांनी परदेशवारी करून आलेल्या लोकांची संपूर्ण माहिती घेतली. तसंच शेती, शेतकरी, शेती उत्पादन मालाची माहिती घेऊन मोलमजुरी करणारे लोक, अल्पभूधारक शेतकरी यांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यासंदर्भात नियोजन करण्याच्या सूचना केल्या.