Home > मॅक्स व्हिडीओ > India Vs China : अरुणाचलच्या तवांगमध्ये घडले दुसरे 'गलवान'; चीनी सैनिकांना भारतीयांनी पिटाळले- राजनाथ सिंह

India Vs China : अरुणाचलच्या तवांगमध्ये घडले दुसरे 'गलवान'; चीनी सैनिकांना भारतीयांनी पिटाळले- राजनाथ सिंह

India Vs China : अरुणाचलच्या तवांगमध्ये घडले दुसरे गलवान; चीनी सैनिकांना भारतीयांनी पिटाळले- राजनाथ सिंह
X

ia Vs China : अरुणाचलच्या (Arunachal Pradesh) तवांग भागातील यांगत्से जवळ 9 डिसेंबर रोजी चीनी सैन्याने भारतीय हद्दीत अतिक्रमण करून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी भारतीय सैन्याने बहादुरी दाखवत चीनी (China) सैन्याला पिटाळून लावले. यावेळी झालेल्या झटापटीत चीनी सैनिक मोठ्या प्रमाणावर जखमी झाले. मात्र भारतीय सैन्य किरकोळ जखमी झाल्याची माहिती राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी संसदेत दिली आहे.

भारत आणि चीनमध्ये (India China) 1993 आणि 1996 मध्ये करार करार करण्यात आले होते. यामध्ये LAC शी संबंधीत मुद्द्यांचा समावेश होता. मात्र 15 आणि 16 जूनच्या मध्यरात्री भारत आणि चीनी सैनिकांमध्ये हाणामारी झाली होती. 21 मे 2020 आणि 15 जून 2020 रोजी दोन वेळा झटापट झाली होती. यामध्ये 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्याप्रमाणेच पुन्हा एकदा भारत आणि चीनी सैनिक अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. त्यामुळे हे दुसरे गलवान असल्याचे म्हटले जात आहे.


Updated : 13 Dec 2022 4:17 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top