Home > मॅक्स व्हिडीओ > महापूरानंतर कोरोना, सलग 2 वर्ष संकटं, मूर्तीकारांवर उपासमारीची वेळ

महापूरानंतर कोरोना, सलग 2 वर्ष संकटं, मूर्तीकारांवर उपासमारीची वेळ

महापूरानंतर कोरोना, सलग 2 वर्ष संकटं, मूर्तीकारांवर उपासमारीची वेळ
X

कोरोनाच्या (corona) संकटामुळे सर्वच पारंपरिक व्यवसायानां फटका बसला आहे. ग्रामीण भागात तर पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात सांगली (Sangli)जिल्ह्यातील गणेश मूर्तीकारांची अवस्था तर आणखी भीषण झाली आहे. गेल्यावर्षी महापुराच्या संकटामुळे गणेशमूर्तीचं मोठं नुकसान झाल्याने या व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागले होते.

या वर्षी तरी चांगले काही तरी होईल या आशेने मूर्तीकार कामाला लागले होते. पण कोरोनाच्या संकटामुळे या मूर्तीकारांचे आता कंबरडेच मोडले आहे. ग्रामीण भागात कुंभार समाज मडकी आणि मुख्य म्हणजे गणपती मूर्तींची विक्री करुन चरितार्थ चालवतो. पण या वर्षी मूर्तींच्या उंचीवर मर्यादा आल्या आणि गणेशमूर्तीची विक्रीही मोठ्या प्रमाणात घटली आहे. गावच्या गावं लॉकडाऊनमध्ये अडकली आहेत. त्याचबरोबर पावसाचं प्रमाणही वाढले आहे. नदी, ओढ्यांचे पाणी पात्रातून बाहेर आल्याने यंदाही काही ठिकाणी पूर परस्थिती निर्माण झाली आहे.

हे ही वाचा...

…आणि “बैल” बोधचिन्हावर अजरामर झाला!

लॉकडाऊनविरोधातील सत्याग्रहाची सुरूवात पंढरपुरातून : प्रकाश आंबेडकर

अंतिम वर्षाच्या परीक्षांचा तिढा, सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला

यंदा पोळा फुटणार नाही…

या परिस्थितीमुळे अनेक मूर्तीकारांच्या गणेशमूर्ती शिल्लक राहणार आहेत असे दिसते आहे. मोठ्या मूर्तीकारांकडे किमान मूर्ती ठेवण्याची सोय आहे. पण ग्रामीण भागातील बहुतांश छोट्या मूर्तीकारांकडे वर्षभर मूर्ती ठेवता येतील अशी जागा नसते. त्यामुळे या मूर्ती विकल्या गेल्या नाही तर काय करायचं असा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. त्याचबरोबर गणेशमूर्तींच्या विक्रीतून मूर्तीकार वर्षभर आपले घर चालवतात आणि लगेच पुढच्या वर्षासाठी मूर्ती बनवण्यास सुरूवात करतात. पण यंदाच्या संकटाने या मूर्तीकारांना उध्वस्त केले आहे. त्यामुळ पुढच्या वर्षासाठी पैसा आणाय़चा कुठून असा प्रश्न या मूर्तीकारांपुढे उभा राहिला आहे.

Updated : 18 Aug 2020 10:14 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top