‘शेम, शेम’ घोषणाबाजीत रंजन गोगोई यांनी घेतली राज्यसभेत शपथ
X
माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आज राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. यावेळी कॉंग्रेस च्या सदस्यांनी शेम शेम च्या घोषणा देत रंजन गोगोई यांच्या नियुक्तीवर आपली नाराजी व्यक्त केली. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आल्यानंतर हा न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यांवर हल्ला असल्याची टीका कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी केला आहे.
माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर त्यांचे सहकारी न्यायाधीश लोकुर यांनी माध्यमांना बोलकी प्रतिक्रिया दिली होती.
काही दिवसांपासून अटकले लावली जात होती की, न्यायाधीश गोगोई यांना सम्मानीत केले जाईल. अशा मध्ये त्यांचं नाव येणं आश्चर्यकारक नाही. मात्र, आश्चर्यकारक हे आहे की, त्यांना इतक्या लवकर सम्मानीत करण्यात आलं. हा निर्णय न्यायपालिकेचे स्वातंत्र, निष्पक्षता आणि अखंडता ते पुन्हा एकदा परिभाषित करतो. शेवटी हा किल्ला ढासळला आहे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
राजकीय पक्षांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना गोगोई यांनी त्यांची संसदेत झालेली निवड न्यायपालिकेची विधायक बाजू मांडण्याची एक संधी असेल. न्यायपालिका आणि कायदेमंडळ यांना राष्ट्र निर्मितेची काम करण्याची गरज आहे. राज्यसभेमधील माझ्या उपस्थितीने मी राज्यसभेत न्यायपालिकेचे मुद्दे ठळकपणे मांडू शकेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
गोगोई यांच्या राज्यसभेच्या निवडी नंतर हे त्य़ांना अयोध्या निकालाचं सरकारने दिलेलं गिफ्ट असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर आजही सुरु आहेत.
रंजन गोगोई सरन्यायाधीश पदी असताना त्यांच्या काळात अयोध्या निकालाचा लागला होता. रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप देखील झाला होता. गोगोई यांच्यावर माजी ज्युनिअर असिस्टंटने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यावेळी न्यायपालिकेला ‘अस्थिर’ करण्याचा हा ‘मोठा कट’ असल्याचंही गोगोई म्हणाले होते.