Home > मॅक्स व्हिडीओ > #BanonFacebook: फेसबूक वर बंदी घालावी का? : मुग्धा कर्णिक

#BanonFacebook: फेसबूक वर बंदी घालावी का? : मुग्धा कर्णिक

#BanonFacebook: फेसबूक वर बंदी घालावी का? : मुग्धा कर्णिक
X

फेसबुकसारख्या (facebook) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही मोदी सरकारचा दबाव असल्याची धक्कादायक माहिती उघड झाल्यानंतर आता यावर विविध घटकांमधील लोकांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. लेखिका मुग्धा कर्णिक ( mugdha karnik) यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना आम्ही जेव्हा फेसबूकवरील पोस्ट बद्दल प्रोफाइल बाबत, फेसबूक कडे तक्रारी करत होतो. तेव्हा त्यांची जी अनेकदा उत्तर येत होती. त्याच्यावरुन ही काही साठगाठ आहे. हे समजून चुकलं होतं.

आत्ताही जेव्हा अशा प्रकारच्या पोस्ट बाबत तक्रारी केल्या जातात. यावर त्या उत्तरात आक्षेपार्य़ काही आढळलं नाही. अशी उत्तर येतात. किंवा ठोस कारवाई काही आढळलं नाही. अशी उत्तर येतात. मात्र, फेसबूक वर बंदी घालावी असं मला वाटत नाही.

कारण कोणत्याही गोष्टीवर जेव्हा आपण बंदी घालण्याची मागणी करतो. तेव्हा वेगवेगळ्या गोष्टींची बंधन आपण आपल्यावर घालून घेतो. असं मत मुग्धा कर्णिक यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केलं.

असत्याचा प्रचार करणं, ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे फेसबूकचं काम नाही. हे आपल्या लोकाचं काम आहे. ही एक मनोवृत्ती आहे. या मनोवृत्ती विरुद्ध कार्य करणं गरजेचं आहे. फेसबूकवर बंदी घालून काही होणार नाही. असं मत मुग्धा कर्णिक यांनी व्यक्त केलं आहे.

हे ही वाचा...

फेसबुकच्या पक्षपाती धोरणाचा हा घ्या पुरावा !

भाजप – फेसबुक संबंध, फेसबुकचे स्पष्टीकरण

Covid19: शरद पवारांच्या कोव्हिड टेस्ट वर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया….

भाजप फेसबुकच्या संबंधांची संसदीय समितीमार्फत चौकशी करा : काँग्रेस

काय आहे प्रकरण?

भाजपच्या काही नेत्यांनी मुस्लीम धार्मिक द्वेष निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्या होत्या. मात्र, सोशल मीडियाच्या माध्य़मांनी या पोस्टवर काय कारवाई केली का? आता हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. या संदर्भात अमेरिकेतील The Wall Street Journal ने एक वृत्त प्रसारीत केलं आहे. या वृत्तात फेसबूक भाजपला कशा पद्धतीने मदत करत आहे. या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

मोदी (Modi) सरकार नाराज झाले तर फेसबुकच्या (Facebook) भारतातील व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत भाजप (BJP) नेत्याच्या मुस्लिम विरोधी पोस्टवर कारवाई करण्यास फेसबुकच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने विरोध केल्याची धक्कादायक माहिती या रिपोर्टमध्ये दिली आहे.

अमेरिकेतील The Wall Street Journal च्या वृत्तानुसार भाजपचे तेलंगणामधील आमदार टी. राजा सिहं (T. Raja Singh) यांच्या फेसबुक पोस्टला प्रक्षोभक वक्तव्यांचे नियम लागू करण्यास फेसबुकच्या भारतातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने विरोध केला होता. टी. राजा यांची एक पोस्ट, काही हिंदुत्ववादी लोक आणि समुहांच्या द्वेषाधारित पोस्ट या हिंसेला प्रवृत्त करु शकतात, असे फेसबुकच्या अंतर्गत धोरणानुसार सिद्ध झाले होते. तरीही फेसबूकच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरुन या पोस्ट डीलिट करण्यात आलं नसल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

Updated : 17 Aug 2020 8:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top